scorecardresearch

Premium

‘ब्रह्मास्त्र’ पाहिल्यावर ऋषी कपूर यांची प्रतिक्रिया काय असती? रणबीर म्हणाला, “ते बॉक्स ऑफिसच्या…”

आपला अभिनय आणि चित्रपटांबद्दल वडील काय प्रतिक्रिया देतील, याबद्दल रणबीरला कायम चिंता वाटायची.

ranbir rishi kapoor
(File Photo – Indian Express)

बॉलिवूडमध्ये सध्या रणबीर आणि आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. फ्लॉप आणि बॉयकॉटच्या ट्रेंडमध्ये रिलीज झालेला हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला. चित्रपट प्रदर्शित होऊन १० दिवस झालेत, पण प्रेक्षक ब्रह्मास्त्र बघण्यासाठी थिएटरला जात आहेत. रणबीर आणि आलियाही चित्रपट हिट झाल्याचं सेलिब्रेशन करत आहेत. अशातच रणबीरने त्याचे दिवंगत वडील आणि अभिनेते ऋषी कपूर यांनी या चित्रपटावर कशी प्रतिक्रिया दिली असती, याबद्दल खुलासा केला आहे.

‘तारक मेहता…’मध्ये दिशा वकाणी परतणार की नवी अभिनेत्री येणार? निर्मात्यांनी दिली महत्वाची माहिती

sardari begum
सूर संवाद : श्रीमंत करणारा अनुभव!
rasika
रसिका सुनील करणार ‘सूर नवा ध्यास नवा’च्या आगामी पर्वाचं सूत्रसंचालन, अनुभव शेअर करत म्हणाली, “पडद्यामागे सगळ्यांची…”
naseeruddin-shah-blog
नसीरुद्दीन शाह – अभिनयाचं चालतं बोलतं विद्यापीठ की चित्रपटांवर टिप्पणी करणारे ‘हौशी’ समीक्षक?
sakhi gokhale suvrat joshi taali
“मला नाही आवडत ते…”, ‘ताली’ पाहिल्यानंतर सखी गोखलेने सुव्रतला दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणाली “आजूबाजूला स्त्रिया…”

ऋषी कपूर अनेकदा अयानच्या कामाची समीक्षा करायचे. ते बॉक्स ऑफिसवर विश्वास ठेवणारे आणि तिथल्या आकडेवारीचा आदर करणारे होते, असं रणबीरने सांगितलं. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत रणबीर म्हणाला, “या चित्रपटावर त्यांची प्रतिक्रिया काय असती, हे सांगणे कठीण आहे. कारण ते अयानच्या कामावरची खूप समीक्षा करायचे. पण माझे वडील नेहमीच बॉक्स ऑफिसवर विश्वार ठेवणारे व्यक्ती राहिलेत म्हणजे बॉक्स ऑफिसवर चित्रपट कसा चालला ही एकमेव गोष्ट मत नोंदवताना ते गृहीत धरायचे आणि तिथल्या आकड्यांचा ते नेहमीच आदर करायचे. त्यांना माहित होतं की जर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली तर कदाचित माझे मत चुकीचे असेल. पण प्रेक्षक हाच खरा राजा आहे आणि बॉक्स ऑफिसच्या वरती दुसरं कोणीच नाही, हे त्यांना माहित होतं.”

नाद खुळा बातमी! कोल्हापूरकर ठरली KBC 14 ची पहिली ‘करोडपती’

आपला अभिनय आणि चित्रपटांबद्दल वडील काय प्रतिक्रिया देतील, याबद्दल रणबीरला कायम चिंता वाटायची. बर्फीमध्ये पाहिल्यानंतर वडिलांची प्रतिक्रिया खूपच कठोर होती, असा खुलासा त्याने यापूर्वी केला होता. यावेळी ब्रह्मास्त्र पाहून वडील खूश झाले असते, असं रणबीर म्हणाला.

Bigg Bossचे घर कुठे आहे? त्याची किंमत किती आणि मालकी कुणाची? जाणून घ्या

दरम्यान, यावेळी रणबीरने पत्नी आलिया भट्टबरोबरचा त्याचा पुढचा प्रोजेक्ट आणि तो रोमँटिक कॉमेडी असेल की नाही यावरून विनोद केला. “आलिया आणि माझी खऱ्या आयुष्यात कॉमेडी सुरू आहे. आम्हाला एकत्र चित्रपट करण्याची गरज आहे की नाही हे मला माहित नाही,” असं म्हणताना रणबीरला हसू आवरत नव्हतं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ranbir kapoor says how dad rishi kapoor would have reacted to brahmastra alia bhatt hrc

First published on: 19-09-2022 at 08:49 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×