अभिनेता रणबीर कपूरचा बहुचर्चित ‘शमशेरा’ चित्रपटाचा टीझर अखेरीस प्रदर्शित झाला आहे. काही तासांमध्येच हा टीझर हजारो लोकांनी पाहिला. टीझरमधील पात्र आणि भव्यदिव्यता पाहून नेटकरी अगदी भारावून गेले आहेत. गेल्या बऱ्याच दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरणारे चित्रपट आणि त्यामुळे बॉलिवूडमध्ये निर्माण झालेली परिस्थिती आता बदलणार असं नेटकरी बोलत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – VIDEO : ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील मायराचा एअरपोर्ट डान्स, परीचा ‘हा’ धम्माल व्हिडीओ एकदा पाहाच

रणबीरची मुख्य भूमिका असलेल्या ‘शमशेरा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचा टीझर पाहिला की रणबीरचा कधीही न पाहिलेला अवतार यामध्ये पाहायला मिळतो. हा नवा लूक पाहून रणबीरचं विशेष कौतुक चाहते करत आहेत.

इतकंच नव्हे तर ‘शमशेरा’ ‘केजीएफ २’, ‘आरआरआर’ चित्रपटांना मागे टाकणार असंही बोललं जात आहे. चित्रपटाच्या टीझरवरुनच चित्रपट कसा असणार याचा अंदाज येतो.

‘शमशेरा’चा टीझर पाहून एका युजरने म्हटलं की, ‘अंगावर शहारे आणणारा चित्रपट. हा चित्रपट नक्कीच सुपरहिट ठरणार.’ ‘बॉलिवूडच्या नवीन पर्वाला रणबीर कपूरपासून सुरुवात झाली आहे. सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करणारा चित्रपट.’ असं दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे. चित्रपटाच्या टीझरमधील प्रत्येक सीन पाहून खरंच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींची कमाई करणार असल्याचं दिसतंय.

आणखी वाचा – Photos : बोल्ड ड्रेस परिधान करत पार्टीमध्ये पोहोचली जान्हवी कपूर, फोटो पाहून नेटकरी म्हणाले…

‘शमशेरा’मध्ये रणबीर कपूर आणि संजय दत्त यांच्यामध्ये बरेच एक्शन सीन आहेत. यातील काही तर घोड्यावर बसून शूट करण्यात आले आहेत आणि त्यासाठी रणबीरनं घोडेस्वारीचं प्रशिक्षण घेतलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण मल्होत्रानं केलं आहे. तसेच चित्रपटात रणबीर व्यतिरिक्त वाणी कपूर, संजय दत्त, आशुतोष राणा, रोनित रॉय आणि सौरभ शुक्ला यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तब्बल १५० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट येत्या २४ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor shamshera movie teaser release fans says actor break every records kmd
First published on: 22-06-2022 at 15:14 IST