१५० कोटी खर्च केले पण… रणबीरचा ‘शमशेरा’ बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला

रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ बॉक्स ऑफिसवर ठरला अपयशी.

१५० कोटी खर्च केले पण… रणबीरचा ‘शमशेरा’ बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला
रणबीर कपूरचा 'शमशेरा' बॉक्स ऑफिसवर ठरला अपयशी

अभिनेता रणबीर कपूरने ‘शमशेरा’च्या निमित्ताने ४ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. रणबीरची या चित्रपटात दुहेरी भूमिका होती. त्यामुळे त्याचे चाहते या चित्रपटासाठी उत्सुक होते. या चित्रपटासाठी तब्बल १५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. चित्रपट यशस्वी होईल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला होता. परंतु या चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना फारसे आवडले नाही आणि त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चित्रपट दणक्यात आपटला.

बॉलिवूडमधील फ्लॉप चित्रपटांच्या यादीतील ‘जग्गा जासुस’ आणि ‘बेशरम’ या चित्रपटांचे रेकॉर्ड देखील ‘शमशेरा’ने तोडले आहेत. या वर्षामधील यशराज प्रोडक्शनचा हा लागोपाठ चौथा फ्लॉप चित्रपट आहे. रणबीर कपूरसह निर्मात्यांनी ‘शमशेरा’ हा चित्रपट नक्की हिट होणार असा दावा केला होता.

आणखी वाचा – ‘शमशेरा’च्या अपयशावर दिग्दर्शक करण मल्होत्रा अखेर बोलला, “मला तिरस्कार पचवणं…”

परंतु दोन आठवड्यातच चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आहे. चित्रपटाचे ओपनिंग कलेक्शन १०.२५ कोटी रुपये होते. वीकएंडला कदाचित चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा होती. पण तेव्हा सुद्धा प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली. दोन आठवड्यात चित्रपटाने केवळ ४२.६५ कोटींची कमाई केली आहे.

आणखी वाचा – रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, करीना कपूर म्हणाली, “मला हा अधिकार…”

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही जोडी पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. त्यामुळे दोघांचेही चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. ‘शमशेरा’च अपयश भरून काढत, ‘ब्रह्मास्त्र’मधून रणबीर पुन्हा प्रेक्षकांची मन जिंकणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Video : “मला चार वेगवेगळ्या…” सोनाली सांगतेय पहिल्याच लग्नाची दुसरी गोष्ट! व्हिडीओ पाहिलात का?
फोटो गॅलरी