अभिनेत्री अमिषा पटेल विरोधात कोर्टाने बजावले अटक वॉरंट

कोर्टाने अमिषाला समन्स पाठवले आहे

अभिनेत्री अमिषा पटेल गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. मात्र सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. रांची कोर्टाने अमिषा पटेल विरोधात चेक बाउंस प्रकरणी वॉरंट काढले आहे. चित्रपट निर्माते अजय कुमारने अमिषावर पैसे घेऊन काम न केल्याचा आरोप केला होता.

अजय कुमार यांनी अमिषाला २०१३ मध्ये ‘देसी मॅजिक’ या चित्रपटासाठी ३ कोटी रुपये दिले होते. २०१८ मध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अमिषा ही रक्कम अजय यांना परत करणार होती. मात्र काही दिवसांमध्ये चित्रपटाचे काम बंद पडल्याचे अजय यांना समजले. त्यानंतर अजय यांनी अमिषाकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. अखेर अमिषाने अडीच कोटींचा चेक दिला. मात्र अजय यांनी तो चेक बँकेत टाकताच बाउंस झाल्याचे त्यांना कळाले.

त्यानंतर अजय यांनी अमिषाच्या विरोधात रांची कोर्टात फसवणूकीचा आरोप करत केस दाखल केली. ‘केस दाखल केल्यानंतर मी अमिषाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अमिषाने माझ्या फोनला उत्तरही दिले नाही’ असे अजय यांनी सांगितले. त्यानंतर कोर्टाने अमिषाला समन्स पाठवले. दरम्यान अमिषाकडे पैसे मागताच तिने काही लोकप्रिय व्यक्तींसोबत फोटो दाखवत धमकावल्याचा आरोपही अजय यांनी केला आहे.

याआधीही अमिषावर चेक बाउंस प्रकरणी गुन्हा दाखत करण्यात आला होता. एका इव्हेंट ऑर्गनायझरची ११ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप अमिषावर करण्यात आला होता. अमिषाने एका लग्नात नृत्य सादर करण्यासाठी ११ लाख रुपये घेतले होते. मात्र काही न कळवताच अमिषाने त्या कार्यक्रमाला येणे टाळले असल्याचे एका इव्हेंट कंपनीने सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ranchi court issued arrest warrant against actress ameesha patel avb

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या