केस कापण्याआधी रणदीप हूडाने गुरुद्वारात मागितली माफी; ‘या’ हॉलिवूड सिनेमासाठी कापले केस

एतिहासिक सिनेमासाठी ३ वर्ष कापले नव्हते केस

randeep-hooda

अभिनेता रणदीप हुड्डाने त्याच्या अभिनय कौशल्याने बॉलिवडूमध्ये स्वत:च स्थान निर्माण केलंय. एखादी गंभीर भूमिका असो. व्हिलन किंवा कॉमेडी सर्व प्रकारच्या भूमिका साकारत रणदीपने प्रेक्षकांची मनं जिकली आहेत. नुतकताच रणदीप सलमान खानच्या ‘राधे’ सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत झळकला आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिलीय.

केवळ बॉलिवूडचं नाहीतर रणदीपने हॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे. गेल्यावर्षी नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या एक्सट्रॅक्शन या सिनेमातून त्याने हॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं आहे. मात्र या सिनेमाच्या भूमिकेसाठी रणदीपला त्याच्या लूकमध्ये बदल करावा लागला असून यासाठी त्याने गुरुद्वारामध्ये माफी देखील मागितली आहे.

एक्सट्रॅक्शन सिनेमाची ऑफर आली तेव्हा रणदीप सारागढीच्या लढाईवर आधारित एका सिनेमाची तयारी करत होता. यासाठी त्याने दाढी आणि केस वाढवले होते. गेल्या तीन वर्षांत त्याने केस कापले नव्हते. एक्सट्रॅक्शन या ह़ॉलिवूडपटात झालेल्या कौतुका बद्दल सांगताना रणदीप एका मुलाखतीत म्हणाला होता, ” एवढ्या उत्कृष्ट कलाकार आणि टीमसोबत मला काम करण्याची संधी मिळाली याचा खूपच आनंद आहे. मी एका इतर प्रोजेक्टसाठी तीन वर्ष तयारी करत होतो. मी माझी दाढी आणि केस वाढवले. एतिहासिक सिनेमा पूर्ण करत नाही तोपर्यंत केस कापणार नाही अशी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात मी शपथ घेतली होती.” असं तो म्हणाला. मात्र यातच रणदीपला हॉलिवूडच्या सिनेमाची ऑफर आली. ज्यात त्याला भूमिकेसाठी केस कापणं गरजेचं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

सारागढीच्या लढाईवर आधरित सिनेमावर काम पूर्ण होणं बाकी असल्याने. त्यामुळे हा एतिहासिक सिनेमा कुठेही जात नाही असं म्हणत रणदीपने अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात माफी मागितली आणि मगच केस कापल्याचं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. तो म्हणाला, “मी आधी हॉलिवूड सिनेमाची ऑफर नाकारणार होतो. मात्र नंतर मी शांतपणे विचार केला. लक्षात आलं हा सिनेमा कुठेही चालला नाही. मग मी गुरुद्वारात गेलो. माफी मागितली आणि केस कापले. त्यानंतर एक्सट्रॅक्शन सिनेमाचं काम सुरू केलं. मी स्क्रिप्ट वाचली होती. त्यात अॅक्शन बद्दल वर्णन होतं. मात्र प्रत्यक्षात या सिनेमात इतकी दमदार अॅक्शन असेल याचा विचार केला नव्हता.” असं रणदीप म्हणाला.

‘राधे’ सिनेमातील रणदीपच्या खलनायकाच्या भूमिकेच सध्या मोठं कौतुक होतंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Randeep hooda apologised in the temple before cutting his hair for hollywood movie extraction kpw

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या