scorecardresearch

रणदीप हुडा साकारणार ‘सरबजीत सिंह’!

‘सरबजीत’ या आगामी हिंदी चित्रपटात अभिनेता रणबीर हुडा ‘सरबजीत’ची भूमिका साकारत आहे.

चित्रपटात सरबजीतच्या बहिणीची (दलबीर कौर)ची भूमिका अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन साकार
चित्रपटात सरबजीतच्या बहिणीची (दलबीर कौर)ची भूमिका अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन साकार

पाकिस्तानमधील कारागृहात अनेक वर्षे तुरुंगवास भोगलेल्या सरबजीत सिंह या भारतीय नागरिकाच्या जीवनावर आधारित ‘सरबजीत’ या आगामी हिंदी चित्रपटात अभिनेता रणबीर हुडा ‘सरबजीत’ची भूमिका साकारत आहे. येत्या १९ मे रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी ‘ट्विटर’वरून ही माहिती दिली. चित्रपटात सरबजीतच्या बहिणीची (दलबीर कौर)ची भूमिका अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन साकारत असून रिचा चढ्ढा व दर्शन कुमार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सरबजीत सिंह याने चुकीने पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर त्याला पाकिस्तानच्या कारागृहात डांबले. तेथे त्याचा छळ करण्यात आला. त्याच्या सुटकेसाठी कुटुंबीयांनी खूप प्रयत्न केले, पण यशस्वी झाले नाहीत .कारागृहातच त्याचा मृत्यू ओढवला. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून तांत्रिक सोपस्कार पार पडल्यानंतर चित्रपट प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-01-2016 at 02:44 IST

संबंधित बातम्या