बॉलिवूडमधील नवाब अर्थात सैफ अली खान सध्या त्याच्या आगामी ‘रंगून’ चित्रपटामुळे प्रकाश झोतात आहे. बॉलिवूडमध्ये २५ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक भूमिका साकारत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चॉकलेट बॉय ते खलनायक अशा अनेक दमदार भूमिका साकारत सैफने अभिनयाचा हुन्नर दाखवून दिला आहे. सैफच्याभोवती दिसणारी चाहत्यांची गर्दी त्याच्या दिसण्यामुळे निर्माण झाली का? अभिनयामुळे प्रेक्षकांवर त्याने जादू केली? असा प्रश्न नक्कीच पडू शकतो. पण या दोन्ही गुणांपेक्षा सैफकडे बॉलिवूडमध्ये त्याचे नाणे खणखणीत असल्याचे बलस्थान असल्याचे  मान्य करावे लागेल. त्याच्या या  बलस्थानाविषयी सांगायचे तर कोणतीही भूमिका साकरण्याची त्याच्यामध्ये जी हिम्मत दिसून येते, ती अन्य कोणत्याही बॉलिवूड कलाकारामध्ये दिसत नाही.

बॉलिवूडमधील पदार्पणामध्ये सैफ अली खानला फारसे यश मिळाले नाही. मात्र सध्याच्या घडीला सैफ अली खान आघाडीचा अभिनेता आहे. त्याच्या लांब केसाच्या स्टाईलने तरुणींच्या आकर्षणाचे केंद्र झालेला सैफ ऐकेकाळी चॉकलेट बॉयच्या नावाने प्रसिद्ध होता. सुरुवातीच्या काळातील आपली छबी बदलत त्याने अनेक वेगळ्या भूमिका साकारल्याचे दिसले. ‘ओमकारा’ चित्रपटातील त्याची भूमिका ही सुरुवातीपेक्षा अगदी वेगळी होती. केशरचनेतील बदलाप्रमाणे त्याने चित्रपटाची योग्य निवड करत वेगळ्या धाटणीच्या अनेक भूमिका केल्या आहेत.

केसाचे फुगे उडविणाऱ्या सैफने ‘कल हो ना हो’ या चित्रपटात एका गुणी तरुणाची व्यक्तीरेखा साकारताना दिसला होता. तर ‘लव्ह आज कल’ या चित्रपटात सरदारजीची भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘गो गोवा गॉन’ या चित्रपटातील रशियन माफियाच्या भूमिकेत त्याने आपल्यातील आणखी एक रुप दाखवून दिले. त्याचा हा लूक सैफ कोणतीही भूमिका साकारु शकतो याचा पुरावाच होता. केसांच्या फुग्यातील सैफ ‘एजंट विनोद’ चित्रपटात हटके केशरचना केल्याचे दिसले. ‘बुलेट राजा’मध्ये सैफने आणखी एक वेगळा अंदाज दाखवून दिला. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्यानंतर ‘रंगून’ मध्ये तो एका वेगळ्याच रंगात दिसणार आहे.

‘रंगून’च्या चित्रिकरणाचे किस्से सांगताना शाहिदने बॉलिवूड नवाबाचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले होते. सैफ कुल अभिनेता आहे. तो खरंच खूप चांगला माणूस असून त्याच्यासोबत काम करताना मला कधीच कोणताच त्रास झाला नाही.  प्रत्येक गोष्टीशी तो सहज जुळवून घेतो, असे शाहिदने म्हटले होते. सैफ अली खानसोबत ‘रंगून’ चित्रपटामध्ये कंगना रणौत आणि शाहिद कपूर दिसणार आहेत. सैफने यापूर्वी भारद्वाजसोबत ‘ओमकारा’ चित्रपटात काम केले होते. ‘रंगून’ येत्या २४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.