करोनाचा रानू मंडललाही फटका, लॉकडाउनमुळे…

रानू मंडलला करोनाचा फटका; आर्थिक विवंचेनेमुळे त्रस्त

एका व्हिडीओमुळे रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल यांना सध्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे. २०१९ मध्ये रानू मंडल यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्या लता मंगेशकर यांचं गाणं गात होत्या. विशेष म्हणजे त्यांचा हा व्हिडीओ पाहून त्या एका रात्रीत प्रकाशझोतात आल्या होत्या. इतकंच नाही तर त्यांनी अभिनेता, गायक आणि दिग्दर्शक हिमेश रेशमियाच्या चित्रपटासाठीदेखील गाणी गायली आहेत.

‘न्यूज18’च्या वृत्तानुसार, करोना विषाणूमुळे ओढावलेल्या संकटाचा सामना साऱ्यांनाच करावा लागत आहे. याचा परिणाम उद्योग, व्यवसायावरही झाला आहे. त्यामुळे रानू मंडल यांनादेखील आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांना मुंबईत काम मिळत नसून त्या करत असलेले स्टेज शो किंवा गाण्याचे कार्यक्रमदेखील त्यांना मिळत नाहीत. त्यामुळे सध्या त्यांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत आहे.

दरम्यान, ‘राणाघाट की लता’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रानू यांना प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचं राहतं जुनं घर सोडून दिलं होतं. त्या नव्या घरात राहायला गेल्या होत्या. मात्र आर्थिक संकट कोसळल्यामुळे त्या पुन्हा त्यांच्या जुन्या घरी परतल्या आहेत.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ranu mandal is on street again not getting work due to coron virus ssj

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या