Video: ‘उद्धटपणा भोवला’, रानू मंडल यांना पुन्हा रस्त्यावर गाताना पाहून नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ranu mandal, ranu mandal video,
डोक्यावर छप्पर नसताना, कुणाचाही आधार नसताना केवळ सुरेल आवाजाच्या जोरावर सोशल मीडियाद्वारे रानू मंडल रोतोरात स्टार झाल्या होत्या. कोलकातामधील एका रेल्वे स्टेशनवर गाणे गाताना रानू यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर बॉलिवूड गायक हिमेश रेशमियाने त्याच्या चित्रपटामध्ये रानू यांना गाणे गाण्याची संधी दिली. मात्र, नंतर रानू या इंटस्ट्रीमधून गायब झाल्या. आता रानू यांचा पुन्हा रस्त्यावर गाणे गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नुकताच रानू मंडल यांचा रस्त्यावर गाणे गातानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये त्या जुन्या वेशभूषेत दिसत आहेत. तसेच त्या एका गाडीसमोर ‘क्या हुआ तेरा वादा’ हे गाणे गाताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेकजण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

एका यूजरने ‘तिचा उद्धटपणा तिला भोवला’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘आता त्यांना पाहणे आणि ऐकणे कुणाला आवडत नाही’ असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने रानू यांची बाजू घेतली आहे. ‘चुका या माणसाकडूनच होतात’ असे म्हटले आहे.

कोलकातामधील एका रेल्वे स्टेशनवर रानू मंडल यांनी ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओने त्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांचा व्हिडीओ पाहून अभिनेता आणि गायक हिमेश रेशमियाने त्याच्या आगमी चित्रपटात रानू यांना गाणे गाण्याची संधी दिली आणि रानू यांचे पूर्ण आयुष्य बदलले. पण हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर त्या इंटस्ट्रीमधून गायब झाल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ranu mandal new video singing song on road goes viral on facebook users are giving reaction avb