सध्या सोशल मीडियावर कच्चा बादाम हे गाणं प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीचा 'कच्चा बादाम' हे गाणं झालं होतं. खरतरं हे गाणं पश्चिम बंगालमधील शेंगदाणा विक्रेता भुबन बड्याकरने गायलं आहे. आता सोशल मीडिया सेन्सेशन ठरलेल्या रानू मंडल यांनी हेच गाणं एक वेगळ्या अंदाजात प्रदर्शित केलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर रानू मंडल यांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. यावर नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया देखील दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, "खूप वाईट गाणं गातेस." दुसरा नेटकरी म्हणाला, "हे गाणं ऐकल्यावर तर, कोणत्या बेसुरीला संधी दिली हा विचार करून हिमेशजी पण आत्महत्या करेल." तिसरा नेटकरी म्हणाला, "कच्चा बादाम गाण्याला काय खराब करते." आणखी एक नेटकरी म्हणाला, "रडते की गाते काही कळत नाही आहे." दुसरा नेटकरी म्हणाला, "बादाम पिकला." तिसरा नेटकरी म्हणाला, "बिचारा कच्चा बादाम." एक नेटकरी म्हणाला, "रानू मंडलच्या गळ्यात अडकला कच्चा बादाम. कच्चा बादाम खूप सुर लावून गाते", अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी रानू मंडल यांना ट्रोल केले आहे. आणखी वाचा : “लतादीदी गेल्यानंतर तुम्ही जसे रडलात तसे माझ्या…”, मुमताज यांनी चाहत्यांना केली विनंती https://www.instagram.com/p/CXFiXE0je1x/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading आणखी वाचा : “करीना आणि करिश्माने मला वडील म्हणून दत्तक घ्यावे”, रणधीर कपूर यांनी व्यक्त केली इच्छा आणखी वाचा : “इंजेक्शन कहीं गलत जगह लग गया?”, माधुरी दीक्षितच्या पतीचा डान्स पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न दरम्यान, याआधी रानू यांनी सहदेवचं 'बचपन का प्यार' हे गाणं पण गायलं होतं. त्यावेळीही त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. याशिवाय त्यांनी अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटातील 'श्रीवल्ली' गाण्याच्या हुक स्टेपवर डान्स करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी रानू मंडल या स्वत:च्या चपलेत अडकून पडता पडता वाचल्या.