भारताने जिंकलेल्या पहिल्यावहिल्या विश्वचषकाला आजही अनेकजण विसरले नाहीत. भारतीय क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा असा ऐतिहासिक क्षण म्हणून याकडे बघितले जाते. ज्या दिवशी भारतीय संघाने विश्वचषका जिंकला त्यादिवशी भारतात आनंदाचे उत्साहाचे वातावरण होते. या ऐतिहासिक घटनेला पुन्हा एकदा प्रेक्षकांपुढे आणण्याचे धाडस दाखवले ते कबीर खान या दिग्दर्शकाने, काही महिन्यांपूर्वी हा चित्रपट प्रदर्शित देखील झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपटाला सुरवातीच्या दिवसांमध्ये प्रतिसाद चांगला होता. रणवीरच्या अभिनयाचे कौतुक झाले मात्र हळूहळू चित्रपटाची लोकप्रियता कमी झाली आणि बॉक्स ऑफिसरवर हा चित्रपट फार यश कमवू शकला नाही. काही दिवसांनी हा चित्रपट ओटीटी प्लँटफॉर्मवर पहायला मिळाला. बॉक्स ऑफिसरवर जरी या चित्रपटाला यश मिळाले नसले तरी नुकतेच या चित्रपटाला ऑस्ट्रेलियात दोन पुरस्कार मिळाले आहेत.

विश्वविजयाचे संदर्भांसहित स्पष्टीकरण

या चित्रपटाचा दिग्दर्शक कबीर खान याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. पोस्टमध्ये तो असं म्हणतो ‘ही खूप खास गोष्ट आहे की देशाच्या ७५ स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मेलबर्न येथे ८३ चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट आणि उत्कृष्ट अभिनेता (रणवीर सिंग) असे दोन पुरस्कार मिळाले आहेत. मेलबर्न तुमचे खूप खूप आभार’, अशा भावुक शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.

८३ या चित्रपटात रणवीर सिंगने तेव्हाचे भारतीय कप्तान कपिल देव यांची भूमिका केली होती. तर दीपिका पदुकोणने पत्नीची भूमिका केली होती तसेच दोघे निर्मात्याच्या भूमिकेत देखील होते. याच चित्रपटात आदिनाथ कोठारे आणि चिराग पाटील हे दोन मराठमोळे चेहरे सुद्धा दिसले होते. चित्रपटाला परदेशात मिळालेल्या पुरस्काराने भारतीयांमध्ये आणि ८३ चित्रपटाच्या टीममध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh and 83 film received award for best film in melbourne spg
First published on: 16-08-2022 at 18:13 IST