रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण झाले अलिबागकर; मापगावमध्ये घेतली ९० गुंठे जागा

सोमवारी अलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यलयात याची नोंदणी करण्यासाठी दीपिका आणि रणवीर आले होते.

Ranveer Singh and Deepika Padukone took 90 gunthas at Alibag Mapgaon
मुंबईपासून जवळ असलेल्या अलिबागमध्ये आता दीपिका आणि रणवीरने दोन बंगले खरेदी केले आहेत. (Photo: Varinder Chawla)

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि पती रणवीर सिंह लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. सिनेसृष्टीचे आघाडीचे कलाकार रणवीरसिंग कपूर आणि दीपिका पदुकोण हे आता अलिबागकर झाले आहेत. अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे ९० गुंठे एने जागा २२ कोटीला खरेदी केली आहे. मुंबईपासून जवळ असलेल्या अलिबागमध्ये आता दीपिका आणि रणवीरने दोन बंगले खरेदी केले आहेत.

दीपिका आणि रणवीरने खरेदी केलेल्या या जागेत दोन बंगले असून नारळ सुपारीची बाग आहे. सोमवारी अलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यलयात याची नोंदणी करण्यासाठी दीपिका आणि रणवीर दोघेही आले होते. त्यानंतर त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ranveer singh and deepika padukone took 90 gunthas at alibag mapgaon abn