scorecardresearch

रणवीर सिंहच्या चाहत्याने चक्क पाठीवर काढला टॅटू, अभिनेत्याच्या ‘या’ कृतीने वेधले सर्वांचेचं लक्ष

रणवीर सिंगच्या या चाहत्याच्या पाठीवर अजय देवगण आणि आयुष्मान खुराना यांचेही टॅटू पाहायला मिळत आहे.

बॉलिवूडमधील प्रत्येक सेलिब्रेटींचे लाखो चाहते असतात. सेलिब्रेटी आणि चाहते यांचे एक वेगळं नातं पाहायला मिळतं. आपल्या आवडत्या कलाकाराचे मन जिंकण्यासाठी कोण काय करेल काहीही सांगता येत नाही. आतापर्यंत याची अनेक उदाहरण समोर आली आहेत. नुकतंच अभिनेता रणवीर सिंहच्या चाहत्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी त्या चाहत्याने केलेले कृत्य पाहून रणवीरही थक्क झाला आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानी याने नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात अभिनेता रणवीर सिंह हा त्याच्या चाहत्यांची भेट घेताना दिसत आहे. रणवीर सिंहने हा नुकतंच दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या ऑफिसमध्ये काही कामासाठी गेला होता. त्याठिकाणी त्याचे अनेक चाहते उपस्थित होते. यावेळी रणवीरने चाहत्यांशी संवादही साधला.

या व्हिडीओत रणवीर हा गाडीतून उतरत पापाराझींना हात दाखवत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर तो त्याच्या एका लहान चाहत्याला भेटतो आणि त्यासोबत फोटो काढतो. यानंतर तो आणखी एका चाहतीला भेटून तिच्यासोबत हँडशेक करतो. यादरम्यान त्याचा आणखी एक चाहता समोर उभा असतो. त्या चाहत्याकडे गेल्यानंतर पापाराझी रणवीरला त्याने टॅटू काढल्याचे सांगतात.

यावेळी रणवीर त्या चाहत्याकडे जाऊन टॅटू काढला आहे? कोणाचा? असे विचारतो. त्यावर आजूबाजूला असणारे लोक सांगतात तुझा टॅटू काढला आहे आणि त्याचवेळी रणवीर त्या चाहत्याच्या पाठीवरील तो टॅटू पाहतो. हा टॅटू पाहिल्यानंतर रणवीर थक्क होतो. ‘अरे बाप रे…’असे म्हणत रणवीर त्याची गळाभेट घेतो. तसेच त्याच्यासोबत संवादही साधतो. दरम्यान रणवीर सिंगच्या या चाहत्याच्या पाठीवर अजय देवगण आणि आयुष्मान खुराना यांचेही टॅटू पाहायला मिळत आहे.

जोनस कुटुंबियांच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलणार, चर्चांना उधाण

दरम्यान रणवीर सिंह हा सध्या त्याच्या कामात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. लवकरच रणवीर हा जयेश भाई जोरदार, सर्कस, रॉकी और रानी की प्रेम कहानी यासारख्या अनेक बिग बजेट चित्रपटात दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ranveer singh arrives in swag at slb office hugs a fan with a tattoo of his face video viral nrp