‘आई शप्पथ आता मोत्यांची माळ’, हटके अंदाजामुळे रणवीर सिंग पुन्हा ट्रोल

रणवीरचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

ranveer singh
रणवीरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल…

बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंग हा त्याच्या अनोख्या फॅशनमुळे ओळखला जातो. रणवीर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत रणवीर चाहत्यांच्या संपर्कात राहतो. रणवीरने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोवरून रणवीरला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

रणवीरने हे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रणवीरने GUCCI या ब्रँडचा हिरव्या रंगाचा ट्रॅकसुट परिधान केला आहे. या सोबतच त्याने मोत्यांची माळा परिधान केली आहे. रणवीरच्या या फोटोंवर नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

आणखी वाचा : पतीच्या अटकेनंतर शिल्पाची भावनिक पोस्ट, केली ‘ही’ विनंती

तर रणवीरच्या या पोस्टवर नेटकरी विनोदी कमेंट करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘दादा काही दिसतंय का तुला?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘लोखंडवालाचा टपोरी.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘आता मोतीचा हार आई शप्पथ.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘आई शप्पत शेवटी मुलांचे कपडे घातलेस.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सर तुम्ही एवढे विचित्र लूक कसे करतात,’ अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी रणवीरला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : ‘हे तर आतंकवाद्यांसारखंच..’; राज कुंद्रांच्या अटकेवर सुनील पालची प्रतिक्रिया

ranveer singh troll
सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी केले रणवीरला ट्रोल

आणखी वाचा : “ए आर रहमान कोण आहे?, ‘भारतरत्न’ माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा”

असे पहिल्यांदाच झालेले नाही की रणवीर कपड्यांमुळे ट्रोल झाला आहे. तो नेहमीच अतरंगी अवतरामुळे ट्रोल होत असतो. दरम्यान, रणवीर लवकरच ‘८३’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट १९८३ च्या वर्ल्ड कपमध्ये दिसणार आहे. त्यानंतर ‘सर्कस’, ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ranveer singh got trolled for wearing pearl necklace dcp