ranveer singh has praised brahmastra at the opening ceremony of ficci frames fast track 2022 | Loksatta

ब्रह्मास्त्र पाहिल्यानंतरची रणवीर सिंहची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “मी अस्त्रव्हर्समधील ब्रह्मास्त्रचा…”

याव्यतिरिक्त त्याने प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहण्यासाठी निवेदनदेखील केले आहे.

ब्रह्मास्त्र पाहिल्यानंतरची रणवीर सिंहची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “मी अस्त्रव्हर्समधील ब्रह्मास्त्रचा…”
चित्रपटातील काही दृश्यांवरुन अभिनेता रणवीर सिंग या भूमिकेत दिसू शकतो असे म्हटले जात आहे.

अयान मुखर्जी लिखित आणि दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र पार्ट १: शिवा’ या बहुचर्चित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे कलेक्शन ३६० कोटींपेक्षा जास्त झाले असल्याची माहिती समोर आली होती. या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही जोडी पहिल्यांदा ऑनस्क्रीन पाहायला मिळाली. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांनी डेट करायला सुरुवात केली होती. काही महिन्यापूर्वी या दोघांनी लग्न केले.

या चित्रपटामध्ये देव या पात्राचा सतत उल्लेख आढळतो. चित्रपट मालिकेतील दुसरा भाग ‘ब्रह्मास्त्र पार्ट २: देव’ हा पूर्णपणे या पात्रावर आधारलेला असणार आहे. थोड्याच कालावधीमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. दरम्यान देव ही मुख्य भूमिका कोण साकारणार याबद्दल सर्वत्र चर्चा सुरु आहे. चित्रपटातील काही दृश्यांवरुन अभिनेता रणवीर सिंग या भूमिकेत दिसू शकतो असे म्हटले जात आहे. दरम्यान एका कार्यक्रमामध्ये त्याने ब्रह्मास्त्रच्या संपूर्ण टीमचे तोंड भरुन कौतुक केले आहे.

आणखी वाचा – दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांच्या आईचे निधन

फास्ट ट्रॅक एफआयसीसीआय फ्रेम्सच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये रणवीरला आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये त्याला ब्रह्मास्त्रविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा या चित्रपटाची स्तुती करत तो म्हणाला, “मी अस्त्रव्हर्समधील ब्रह्मास्त्रचा पुरेपूर आनंद घेतला. हिंदी सिनेसृष्टीमध्ये कधीही न पाहिलेल्या गोष्टी मला हा चित्रपट पाहताना अनुभवता आल्या. हा वेगळा प्रयोग केल्याबद्दल मी अयान आणि संपूर्ण टीमचे आभार मानतो. या चित्रपटामुळे सिनेसृष्टीसाठी नवे मार्ग खुले झाले आहेत” याव्यतिरिक्त त्याने प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहण्यासाठी निवेदनदेखील केले आहे.

आणखी वाचा – मराठी मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा ‘दृश्यम २’मध्ये दिसणार, अजय देवगणबरोबर करणार काम

ब्रह्मास्त्र या चित्रपट मालिकेतील दुसरा भाग २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. ब्रह्मास्त्र पार्ट २: देवमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण दिसू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. यात ती अमृता हे महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
दीपिका- कतरिना नाही तर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीवर होतं रणबीरचं प्रेम, पण…

संबंधित बातम्या

जूही चावलाने आमिर खानला किस करण्यास दिला होता नकार; सेटवरच तिने…
महेश मांजरेकर यांची लेक सई करतेय प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलाला डेट?
“नाझी आणि हिटलरबद्दल मला प्रेम वाटतं कारण…” कान्ये वेस्टचे वादग्रस्त वक्तव्य
इतक्यात आजी होण्याची इच्छा नाही- सुप्रिया पिळगावकर
‘बाहुबली’च्या अवंतिकाबद्दल या पाच गोष्टी माहिती आहेत का?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात निधीचा ओघ; अलिबाग, मुरुड मतदारसंघात २५२ कोटींचा निधी
छत्तीसगड मुख्यमंत्री कार्यालयातील उपसचिवास ‘ईडी’कडून अटक; कोळसा घोटाळाप्रकरणी कारवाई
‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा : मुंबई, कोल्हापूर केंद्रांमध्ये आजपासून प्राथमिक फेरी
नेपाळची बस सावंतवाडी बावळट येथे कलंडली
आरोग्य वार्ता : लठ्ठ महिलांना ‘लाँग कोविड’ची शक्यता अधिक