रणवीर सिंगची हटके स्टाइल! ‘हा’ खास संदेश देण्यासाठी चढला गाडीच्या टपावर

पाहा, रणवीरने चाहत्यांना कोणता संदेश दिला

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग कायम या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी त्याच्या हटके लूकमुळे तर कधी तो करत असलेल्या स्टंटमुळे. सध्या सोशल मीडियावर रणवीरचा असाच एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने चाहत्यांना एक मोलाचा संदेश दिला आहे. मात्र, हा संदेश देताना त्याने जी शक्कल लढवली त्याची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

सध्या सोशल मीडियावर रणवीरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गाडीच्या टपावर उभा राहिला असून त्याने चाहत्यांना सध्याच्या काळात स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझर लावा असं तो चाहत्यांना सांगत आहे.

 

View this post on Instagram

 

#RanveerSingh snapped post his shoot. Climbs up on his car so he can address his fans well.Rachana Shah

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on


दरम्यान, रणवीर सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. लवकरच तो ’83’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो क्रिकेटपटू कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ranveer singh jumps on his car roof to deliver a message when surrounded by crowd of fans viral video on social media ssj