काही दिवसांपासून ‘झोंबिवली’ हा मराठी चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहेत. या चित्रपटात ‘झोम्बी’ आणि त्याविषयी कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात असलेले कलाकार सोशल मीडियावर सतत पोस्ट शेअर करत चाहत्यांना या चित्रपटाविषयी काही हिंट देताना किंवा मग यातल्या गाण्यावर त्यांचा डान्स शेअर करताना दिसतात. असाच एक व्हिडीओ वैदेही परशुरामीने शेअर केला आहे.

वैदेहीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत वैदेही, सिद्धार्थ जाधव आणि अमेय वाघ दिसत आहेत. या व्हिडीओत ते ‘झोंबिवली’ या गाण्यावर डान्स करत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत मित्रांनो चला, “आता मिळून एकदम क्रेझीवाला ‘झोंबिवली’ डान्स करूया” असं कॅप्शन तिने दिलं आहे. वैदेहीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बॉलिवूडचा बाजीराव अभिनेता रणवीर सिंगने या पोस्टवर कमेंट केली आहे. रणवीरला सिद्धार्थचा डान्स आवडल्याचे दिसत आहे. त्याने “सिद्धू बाबा के जलवे” अशी कमेंट केली आहे. त्यावर उत्तर देत सिद्धार्थनेही “रणवीर दादा के जलवे ही जलवे” असे म्हटले आहे.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: आम्हीही तेव्हाच ‘व्हेटो’विरोधात होतो..
Social activist Kiran Verma buys schoolbag for Uber drivers daughter
माणुसकी हाच खरा धर्म! उबर ड्रायव्हरच्या मुलीसाठी विकत घेतली स्कूल बॅग; नेटकरी म्हणाले, ” “जगाला तुझ्या सारख्या माणसांची गरज …”
a child girl dance on krishnas bhajan in satsang
VIDEO : चिमुकलीने कृष्णाच्या भजनावर केले नृत्य, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “याला म्हणतात संस्कार…”

आणखी वाचा : मुलीकडे KISS मागण्यावरून अभिजित बिचुकलेवर संतापली देवोलिनाची आई, म्हणाली…

आणखी वाचा : सेक्स सीन देताना घडलं असं काही की जॉनला मागावी लागली कंगनाची माफी?

‘झोंबिवली’ या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर, अमेय वाघ, अभिनेत्री वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे. या चित्रपटाची कथा ‘झोम्बी’ या कल्पनेवर आधारित आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता. पण करोनामुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट पुढच्या वर्षी ४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.