बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी हे त्यांचा आगामी चित्रपट ‘गहराइयां’मुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरमधील दीपिका आणि सिद्धांतमधील केमिस्ट्री चाहत्यांच्या विशेष पसंतीला देखील उतरत आहे. त्यांनी चित्रपटात काही बोल्ड सीन्स देखील दिले आहेत. ते पाहून दीपिकाचा पती रणवीर सिंहने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
‘गहराइया’ चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकच नव्हे तर अनेक कलाकारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. दीपिकाचा पती अभिनेता रणवीर सिंहने देखील त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘गहराइया’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्ट शेअर करत त्याने, ‘मूडी, सेक्सी आणि इंटेन्स.. डोमेस्टिक नोअर? मला चित्रपटासाठी साइन करा… शुकन बत्रा, अनन्या पांडे, सिद्धार्थ चतुर्वेदी, धैर्य कराव तुम्ही सगळेच माझे आवडते कलाकार आहात. नसीर द लीजेंड.. माझी बेबी गर्ल’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.




दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य कारवा यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात अभिनेता नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अमेझॉन प्राइम व्हिडीओ’वर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन शकुन बत्रा करत आहेत तर करण जोहरचं धर्मा प्रॉडक्शन आणि व्हायकॉम १८ या चित्रपटाचे निर्माते आहेत.