scorecardresearch

‘दीपिका कधी देणार गुडन्यूज?’ गोविंदाच्या पत्नीनं विचारला प्रश्न, रणवीर म्हणतो…

रणवीर सिंहला गोविंदाच्या पत्नीनं, ‘दीपिका गुडन्यूज कधी देणार?’ असा प्रश्न विचारला होता. यावर त्याने फारच मजेदार उत्तर दिलं.

‘दीपिका कधी देणार गुडन्यूज?’ गोविंदाच्या पत्नीनं विचारला प्रश्न, रणवीर म्हणतो…
मागच्या बऱ्याच काळापासून रणवीर-दीपिका आई-बाबा कधी होणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह नेहमीच प्रसिद्ध अभिनेता गोविंदा यांचं कौतुक करताना दिसतो. तो गोविंदा यांचा चाहते आहे हे तर आता कोणापासूनच लपून राहिलेलं नाही. नुकतीच गोविंदा यांनी त्यांची पत्नी सुनिता यांच्यासोबत रणवीर सिंहच्या ‘द बिग क्विज शो’मध्ये हजेरी लावली. यावेळी या दोघांनीही रणवीरला त्याच्या खासगी आयुष्याबाबत प्रश्न केले. गोविंदा यांची पत्नी सुनिता यांनी रणवीरला, दीपिका पदुकोण गुड न्यूज कधी देणार असा प्रश्न विचारला आणि यावर रणवीरनंही त्यांना धम्माल उत्तर दिलं.

मागच्या बऱ्याच काळापासून रणवीर-दीपिका आई-बाबा कधी होणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशात आता या शोमध्ये सुनिता यांनी विचारलेल्या प्रश्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. गोविंदा यांची पत्नी सुनिता रणवीरला म्हणाल्या, ‘तुमच्या लग्नाला ३ वर्ष झाली आहेत. मग आता मला छोटासा रणवीर कधी पाहायला मिळणार आहे. आज चाहत्यांना सांगूनच टाक की दीपिका कधी गुडन्यूज देणार आहे.’ सुनिता यांचं बोलणं ऐकून रणवीर चक्क लाजतो आणि त्यावर गोविंदा जोरजोरात हसू लागतात.

सुनिता यांना उत्तर देताना रणवीर म्हणाला, ‘मी तुम्हाला नंतर सांगतो, मी तर पूर्ण तयारी केली आहे. ज्या गोष्टींसाठी सल्ला आणि टीप्स घ्यायला हव्या त्या मी घेत आहे. बाळासाठी नावं पण निवडून ठेवली आहेत. मी तर एकदम तयारीत आहे. फक्त वाट पाहत आहे. मी बाबा होण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही.’

रणवीरचं बोलणं ऐकून गोविंदा यांची पत्नी म्हणते, ‘माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. तुम्ही दोघंही तुमचे प्रयत्न चालू ठेवा. सर्वकाही लवकरच होईल.’ दरम्यान गोविंदा यांच्या अगोदर रणवीर सिंहच्या या क्विज शोमध्ये करण जोहर, काजोल, शत्रुघ्न सिन्हा, सोनाक्षी, सलमान खान, आयुष शर्मा, कतरीना कैफ आणि रोहित शेट्टी यांनी हजेरी लावली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ranveer singh reply to govida s wife after she ask him when deepika padukone will give us good news mrj

ताज्या बातम्या