Photo : बेबी फिल्टरचा प्रयोग दीपिकाच्या फोटोवर, रणवीरने शेअर केला फोटो

या फोटोमध्ये दीपिका प्रचंड गोड दिसत आहे

दीपिका पादुकोण

हटके स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखला जाणारा अभिनेता रणवीर सिंह रिअल आयुष्यातही तितकाच कूल आहे. त्यामुळेच सोशल मीडियावरही त्याचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याचं पाहायला मिळत. रणवीर अनेक वेळा याच सोशल मीडियाच्या माध्यमातून दीपिकाप्रतीचं प्रेम व्यक्त करत असतो. यावेळीदेखील त्याने असंच काहीसं केलं असून त्याने इन्स्टाग्रामवर दीपिकाला चक्क लहान मुलं केलं आहे.

रणवीरने स्नॅपचॅट या अॅपच्या माध्यमातून दीपिकाचा फोटो एडिट केला असून तिला लहान मुलीचा लूक दिला आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये दीपिका प्रचंड गोड दिसत आहे. स्नॅपचॅट या अॅपच्या माध्यमातून एखाद्या वस्यक व्यक्तीचा फोटो फिल्टर करुन तो लहान मुलासारखा करता येतो.

 

View this post on Instagram

 

@deepikapadukone

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

काही दिवसांपूर्वी दीपिकाने ‘कान्स’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने ‘लाइम ग्रीन’ रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता. याच ड्रेसवरील दीपिकाचा फोटो रणवीरने फिल्टरसाठी वापरला आहे. रणवीरने फिल्टरचा वापर करुन दीपिकाचा चेहरा लहान मुलीसारखा केला. हा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून दीपिकाला टॅग केलं आहे. त्यासोबतच काही इमोजींचाही वापर केला आहे.

दरम्यान, रणवीर सध्या त्याच्या आगामी ’83’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर ’83’ हा चित्रपट आधारलेला आहे. यात रणवीरने तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारली आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ranveer singh shares deepika padukones pic with baby face filter fans cant get enough of her cuteness

ताज्या बातम्या