बादशाहने फेक व्ह्यूजसाठी मोजले 75 लाख रुपये? दिले स्पष्टीकरण…

या संदर्भात शुक्रवारी मुंबई पोलिसांनी बादशाहची चौकशी केली.

बॉलिवूड रॅपर-सिंगर बादशाहवर सोशल मीडियावर फेक व्ह्यूज खरेदी करण्याचा आरोप करण्यात आला होता. या संदर्भात शुक्रवारी मुंबई पोलिसांनी बादशाहची चौकशी केली. जवळपास नऊ तास पोलिसांनी बादशाहची चौकशी केली. तसेच या चौकशीनंतर बादशाहने हे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.

‘फेक व्ह्यूज संदर्भात मुंबई पोलिसांनी माझी चौकशी केली. मी माझ्याकडून त्यांना सहकार्य केले. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप मी नाकारले आहेत. तसेच अशा कोणत्याही कामात मी सहभागी नव्हतो असे त्यांना सांगितले आहे. यासंर्भात तापस करत असलेल्या ऑथॉरिटीवर माझा पूर्ण विश्वास आहे. ज्या लोकांना माझी काळजी वाटत होती त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो’ असे बादशाह म्हणाला.

गेल्या महिन्यात मुंबई पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याचे उल्लंघन करणारी एक केस समोर आल्याचा खुलासा केला होता. या केसमध्ये बॉलिवूडमधील मोठ्या लोकांच्या काही कंपन्यांनी इन्स्टाग्राम, ट्विटर आणि अन्य सोशल मीडियावर फेक फॉलोअर्स खरेदी केल्याचे म्हटले होते. या संदर्भात तपास सुरु असताना समोर आलेल्या यादीमध्ये बादशाहचे नाव देखील होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला समन्स पाठवले होते.

बादशाहचे ‘पागल है’ हे गाणे काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले होते. हे गाणे प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी ७.५ कोटी लोकांनी पाहिले आणि हा जागतिक विक्रम झाल्याचे समोर आले. पण गुगलने हा जागतिक विक्रम नसल्याचे म्हटले. त्यानंतर, पोलिसांनी या संदर्भात चौकशी केल्यानंतर बादशाहाने एका जाहिरात कंपनीला ७५ लाख रुपये रक्कम दिली होती. पण ही रक्कम फेक व्ह्यूजसाठी देण्यात आली होती की आणखी कोणत्या कामासाठी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rapper badshah denied all the allegations of fake followers avb

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या