Grammy Awards 2025: संगीत विश्वातील प्रतिष्ठित मानला जाणारा ‘ग्रॅमी पुरस्कार २०२५’ हा सोहळा २ फेब्रुवारीला मोठ्या दिमाखात पार पडला. लॉस एंजेलिसमधील क्रिप्टो टाउन एरिया येथे यंदाचा ‘ग्रॅमी पुरस्कार’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर भारतात ‘ग्रॅमी पुरस्कार’ सोहळा ३ फेब्रुवारीला पहाटे ६.३० वाजल्यापासून ‘डिज्नी प्लस हॉटस्टार’वर स्ट्रीमिंग झाला.

यंदा ‘ग्रॅमी पुरस्कार’ सोहळ्याचं ६७वं वर्ष होतं. या सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकार मंडळींनी आपला जबरदस्त परफॉर्मन्स केला. तसंच काही सेलिब्रिटींनी आपल्या अनोख्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पण, या सोहळ्यातील सर्वाधिक चर्चा झाली प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्टची पत्नी बियांका सेंसरीची. ‘ग्रॅमी पुरस्कार’ सोहळ्याच्या रेड कार्पेटवर सर्वांचा आश्चर्याचा धक्का देणारा लूक बियांकाने केला होता. याची चर्चा जगभरात अजूनही सुरू आहे. नेमकं काय घडलं? आणि याविषयी कान्ये वेस्ट नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या…

कान्ये वेस्टची पत्नी बियांकाने ग्रॅमीच्या रेड कार्पेटवर न्यूड लूक केला होता. सुरुवातीला रेड कार्पेटवर येताना बियांका वेस्टबरोबर आली. तेव्हा तिने काळ्या रंगाचं लॉन्ग जॅकेट घातलं होतं. पण जशी माध्यमांना पोज देण्याची वेळ आली, तेव्हा बियांकाने काळ्या रंगाचं जॅकेट सगळ्यांसमोर उतरवलं. यावेळी तिने ट्रान्सपरंट कपडे घातले होते. पण, ही कला असल्याचं वक्तव्य करत कान्ये वेस्टने पत्नीने केलेल्या न्यूड लूकचं समर्थन केलं आहे.

‘द सन’च्या वृत्तानुसार, बियांकाचा हा स्टंट असल्याचं म्हटलं गेलं. कान्ये वेस्टने पत्नीच्या त्या कृत्याचं समर्थन करत “ही एक कला” असल्याचं सांगितलं. तसंच ग्रॅमीमधला संगीताचा कार्यक्रम कंटाळवाणा असल्याचं म्हणत कधी पाहणार नाही, असं उघडपणे वेस्ट म्हणाला.

दरम्यान, बियांकाच्या न्यूड लूकमुळे कान्ये वेस्टसह तिला ‘ग्रॅमी पुरस्कार’ सोहळ्यात येऊ दिलं नाही, असं म्हटलं जात आहे. सुरक्षा रक्षकाने बियांका आणि कान्येला रेड कार्पेटवरूनच बाहेरचा रस्ता दाखवला. ‘टेलीचक्कर’च्या माहितीनुसार, कान्ये आणि बियांकाला ‘ग्रॅमी पुरस्कार २०२५’ सोहळ्याचं आमंत्रण दिलं गेलं नव्हतं. त्यामुळे त्यांना एन्ट्री दिली गेली नाही.

Story img Loader