प्रसिद्ध रॅपर रफ्तार घेणार घटस्फोट, लग्नाच्या अवघ्या ६ वर्षांमध्येच मोडला संसार

सुप्रसिद्ध रॅपर रफ्तार पत्नी कोमल वोहरापासून लवकरच विभक्त होणार आहे.

rapper raftaar divorce with wife, raftaar wife komal vohra, raftaar divorce with wife, raftaar divorce, raftaar
सुप्रसिद्ध रॅपर रफ्तार पत्नी कोमल वोहरापासून लवकरच विभक्त होणार आहे.

सुप्रसिद्ध रॅपर रफ्तार सिंगची प्रत्येक गाणी आजवर सुपरहिट ठरली आहेत. तरुणाईला वेड लावणारा रफ्तार आता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. रफ्तार पत्नी कोमल वोहरापासून लवकरच विभक्त होणार आहे. त्याच्या या निर्णयामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या काही वर्षांपासून रफ्तार आणि कोमल वेगवेगळे राहत आहेत. आता अधिकृतरित्या घटस्फोट घेण्याचा दोघांनीही निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा – VIDEO : धारावीच्या गल्लीत फिरणाऱ्या सुनील शेट्टीचं नेटकऱ्यांना कौतुक, म्हणाले, “याला बॉडीगार्डची गरजच नाही कारण…”

२०१६मध्ये रफ्तारने कोमलशी लग्नगाठ बांधली. अगदी थाटामाटात रफ्तार-कोमलचा विवाहसोहळा पार पडला. लग्नाच्या अवघ्या सहा वर्षांमध्येच रफ्तार आणि कोमल एकमेकांच्या सहमतीने विभक्त होत आहेत. २०२०मध्येच या दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मात्र करोना काळामध्ये ही सगळी प्रक्रिया लांबणीवर गेली. पण रफ्तार याची लव्हस्टोरी अगदी फिल्मी स्टाइल होती.

रफ्तारचा प्रेमविवाह होता. २०११पासून रफ्तार कोमलला डेट करत होता. कोमलला पाहताक्षणीच रफ्तार तिच्या प्रेमात पडला. लग्नापूर्वी काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण लग्नाच्या काही वर्षांतच रफ्तार-कोमलमध्ये मतभेद होण्यास सुरुवात झाली.

आणखी वाचा – ‘धर्मवीर’मध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा संताप, म्हणाला, “राजकीय घडामोडी सुरु असताना…”

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, रफ्तार-कोमलच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं की, दोघंही आपापल्या आयुष्यामध्ये पुढे गेले आहेत. ६ ऑक्टोबर २०२२मध्ये दोघं अधिकृतरित्या एकमेकांपासून विभक्त होतील. लग्नाच्या काही महिन्यांनंतरच दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली होती. मात्र एकमेकांच्या कुटुंबाविषयी दोघांनाही विशेष प्रेम आहे. रफ्तार आणि कोमलने इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन एकमेकांना अनफॉलो केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rapper raftaar singh will end his 6 year marriage couple file divorce from wife komal vohra see details kmd

Next Story
प्राजक्ता माळीने शेअर केला मुक्ता बर्वेसोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाली “तुझ्याबरोबर…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी