‘शर्म है या बेच दी’, बोल्ड ड्रेस परिधान करुन डान्स केल्यामुळे रश्मी देसाई झाली ट्रोल

तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

rashmi desai,

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे रश्मी देसाई. ‘उतरन’ या मालिकेतून रश्मी घराघरात पोहोचली. आज तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. रश्मी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकताच रश्मीने पोस्ट केलेला एक व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडीओमूळे तिला ट्रोल देखील केले जात आहे.

रश्मीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आकाशी रंगाच्या शॉर्ट स्कर्ट आणि टॉप परिधान केला आहे. या हॉट ड्रेसमधील तिचा डान्स पासून तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणारवर ट्रोल केले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai)

आणखी वाचा : करीना कपूर खान पोहोचली नानावटी रुग्णालयात, काय आहे नेमकं कारण?

एका नेटकऱ्याने ‘कुठे जायचा विचार करत आहेस रश्मी. लाज आहे की विकलीस. ग्लॅमरचा अर्थ असा नाही की तू काहीही परिधान करु शकतेस. तू माझी आवडती अभिनेत्री होतीस पण आता नाहीस’ असे म्हणत तिला सुनावले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘बाहेर करोना आहे घरात रहा’ असे म्हणत तिला ट्रोल केले आहे.

रश्मी ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये देखील दिसली होती. तिने अनेक मालिकांमध्येही काम केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rashmi desai hot dance video viral on social media and get trolled avb

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या