‘हार जीत तो परिणाम है, कोशिश तो हमारा काम है’, रश्मी रॉकेटचा ट्रेलर प्रदर्शित

ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून व्हायरल झाला आहे.

rashmi rocket, rashmi rocket movie, rashmi rocket trailer,
चित्रपटात तापसी मुख्य भूमिकेत आहे.

आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तापसी या चित्रपटातील भूमिकेसाठी तयारी करत होती. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा फर्स्ट लूक देखील प्रदर्शित करण्यात आला. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

२ मिनिटे ५० सेकंदाच्या ट्रेलरमध्ये कच्छ मधील एका छोट्या गावातल्या तरुण मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. तिच्याकडे धावण्याची एक अविश्वसनीय अशी शक्ती आहे. रश्मीला देशासाठी अॅथलेटिक स्पर्धा जिंकायची असते. पण तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. तापसी पन्नूचा अभिनय पाहाण्यासारखा आहे.

दिग्दर्शक आकाश खुराना आणि तापसी पन्नू ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटाच्या निमित्ताने दुसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रश्मी रॉकेट हा चित्रपट निर्मात्यांनी ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांच्यात ५८ कोटी रुपयांची डील झाल्याचे म्हटले जाते. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rashmi rocket movie trailer avb

फोटो गॅलरी