“पॅन्ट घालायला विसरली”, एअरपोर्ट लूकमुळे अभिनेत्री रश्मिका मंदाना ट्रोल

रश्मिका मंदाना लवकरच ‘मिशन मजनू’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

rashmika-madnana
(Photo-Instagram@rashmika_mandanna)

सोशल मीडिया सेंसेशन आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना नेटकऱ्यांमध्ये कायमच चर्चेत असते. रश्मिकाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. नुकतच रश्मिकाला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून रश्मिकाला तिच्या लूकमुळे नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय.

रश्मिकाला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. यावेळी तिने गुलाबी रंगाचं एक लांब टी-शर्ट परिधान केलं होतं. खरं तर या टी-शर्टखाली तिने निळ्या रंगाची शॉर्ट परिधान केली होती. मात्र ही शॉर्ट अगदी तोकडी असल्याने ती दिसतही नव्हती. त्यामुळे रश्मिकाने केवळ लांब टी-शर्टच परिधान केलंय असं व्हिडीओत दिसतंय. तिच्या या कपड्यांमुळेच काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने रश्मिकचा हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय.

‘हौसला रख’ सिनेमच्या प्रमोशनवेळी सिद्धार्थच्या आठवणीत शेहनाजला अश्रू अनावर, व्हिडीओ व्हायरल

रश्मिकाच्या या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, “ताई खाली काही कपडे घालायचे होते ना” तर दुसरा युजर म्हणाला, “म्हणजे मुंबईत थंडी नाहीय तर” आणखी एक युजर कमेंट करत म्हणाला, “ती पॅन्ट घालायला विसरली”

रश्मिका मंदाना लवकरच ‘मिशन मजनू’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमात ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत झळकणार आहे. तसचं नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पुष्पा द राइज’ या सिनेमामुळे ती सध्या चर्चेत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rashmika mandana troll for wearing short t shirt viral video kpw

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या