Rashmika Mandana & Vijay Deverakonda Net Worth : रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. दोघांनीही ही गोष्ट गुपित ठेवली होती. मात्र, सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चेमुळे त्यांनी ते लग्न करत असल्याची माहिती दिली. २६ फेब्रुवारीला दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. रश्मिका व विजय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय सेलिब्रिटी आहेत. दोघांनी आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत; परंतु, तुम्हाला माहीत आहे का या दोघांची संपत्ती किती आहे?
रश्मिका मंदाना दाक्षिणात्य चित्रपटांत व बॉलीवूडमध्ये काम करते. तिची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या अनेक चित्रपटांनी आजवर कोट्यवधींची कमाई केली आहे. अभिनेत्रीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. तर विजय देवरकोंडा हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्यानंही काही बॉलीवूड चित्रपटांत काम केलं आहे. परंतु, तुम्हाला माहीत आहे का चित्रपटांसाटी कोट्यवधींचं मानधन घेणाऱ्या या दोन सेलिब्रिटींपैकी सर्वांत श्रीमंत कोण आहे आणि त्यांची संपत्ती किती आहे?
रश्मिका मंदानाची संपत्ती किती?
एबीपीच्या वृत्तानुसार रश्मिका मंदानाची संपत्ती ६६ कोटी रुपये आहे. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार तिनं हे पैसे चित्रपट आणि जाहिरातींतून कमावले आहेत. तर, माध्यमांच्या वृत्तानुसार रश्मिका एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपयांचं मानधन घेते. ती एका चित्रपटासाठी चार ते आठ कोटी रुपये इतकं मानधन आकारते. एवढंच काय, तर तिला एका चित्रपटासाठी १० कोटी रुपयेसुद्धा मिळाले आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त रश्मिका ब्रँड इंडोर्समेंट, जाहिरातीमधूनसुद्धा चांगले पैसे कमावते. ती ब्युटी, फॅशन या प्रॉडक्ट्सच्या जाहिराती करते.
रश्मिका यासह नामांकित प्लम या ब्युटी ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडरही आहे. त्यासह तिचे यामध्ये शेअर्ससुद्धा आहेत. रश्मिकाची बंगळुरू, मुंबई, गोवा, हैदराबाद यांसारख्या शहरांमध्ये संपत्तीसुद्धा आहे, ज्यातील तिच्या फक्त बंगळुरूतील घराची किंमत तब्बल आठ कोटी इतकी आहे. रश्मिकाकडे आलिशान गाड्यांचं कलेक्शनही आहे. तिच्याकडे ऑडी ३q, रेंज रोवर, मर्सिडीज बेंज सी-क्लास यांसारख्या महागड्या गाड्यासुद्धा आहेत.
विजय देवरकोंडाची संपत्ती किती?
दुसरीकडे रश्मिकाचा होणारा नवरा अभिनेता विजय देवरकोंडाच्या जाहिरातींबद्दल बोलायचं झालं, तर तो टॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. कोईमोईच्या वृत्तानुसार विजय देवरकोंडाची संपत्ती ६६ कोटी ते ७० कोटींपर्यंत आहे, तो मुख्यत; चित्रपटांतून पैसे कमावतो.
माध्यमांच्या वृत्तानुसार विजय एका चित्रपटासाठी रश्मिकापेक्षा अधिक मानधन घेतो. तो एका चित्रपटासाठी १२ ते १५ कोटी रुपये मानधन घेतो. विजयसुद्धा ब्रँड एंडोर्समेंटमधून पैसे कमावतो. तो एका ब्रँड एंडोर्समेंट डीलचे एक कोटी रुपये घेत असल्याचं म्हटलं जातं. तर, तो इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्याचे ४० लाख रुपये घेतो. अभिनयासह तो एक उद्योजकसुद्धा आहे. त्याचा एक क्लोदिंग ब्रँडसुद्धा आहे. हैदराबादमध्ये त्याचं आलिशान घर आहे. हैदराबाद येथे त्याचं १५ कोटी इतकी किंमत असलेलं आलिशान घर आहे.
रश्मिकाप्रमाणे विजयकडेही आलिशान गाड्यांचं कलेक्शन आहे. त्याच्याकडे बीएमडब्ल्यू ५ सीरिज, फोर्ड, मर्सडीज बेंझ, रेंज रोव्हर या गाड्या आहेत. तर, माध्यमांच्या वृत्तानुसार ३० कोटींची किेमत असलेलं प्रायवेड जेटही त्याच्याकडे आहे.

