scorecardresearch

रश्मिका मंदाना विजय देवरकोंडाला नाही तर ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याला करतेय डेट?; जाणून घ्या सत्य

आता रश्मिका विजयला नाही तर दुसऱ्याच एका अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

rashmika vijay

आघाडीची दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. ‘पुष्पा’ चित्रपटातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं.  तिचे फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. भारतात तसेच भारताबाहेर तिचे करोडो चाहते आहेत. रश्मिकाच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी देखील तिच्या हाती खूप उत्सुक असतात. तर आता तिच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि साऊथ अभिनेता विजय देवरकोंडा एकमेकांना डेट करत असल्याचं गेले काही महिन्यांपासून बोललं जात होतं. हे दोघं अनेकदा त्यांच्या मैत्रीबद्दल खुलेपणाने बोलतात पण डेटिंगचा विषय निघाला की ते मौन धरतात. पण आता रश्मिका विजयला नाही तर दुसऱ्याच एका अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

आणखी वाचा : Video: …अन् श्रीवल्ली मराठीत बोलू लागली, रश्मिका मंदानाचा मराठमोळा अंदाज चर्चेत

‘ई टाइम्स’ला दक्षिणात्य सिनेसृष्टीतील एकाने दिलेल्या वृत्तानुसार अभिनेत्री रश्मिका मंदाना आता विजय देवरकोंडाच्या ऐवजी बेलमकोंडा श्रीनिवास याच्याबरोबर अनेकदा फिरताना दिसत आहे. ती दोघं एकमेकांना आता डेट करत आहेत. पण अद्याप त्या दोघांपैकी कोणीही त्यांच्या रिलेशनशिपबद्दल भाष्य केलेलं नाही.

हेही वाचा : “मी आजही माझ्या एक्सबरोबर…”, रश्मिका मंदानाने तिच्या अफेअरबद्दल केला मोठा खुलासा

दरम्यान, रश्मिका मंदाना लवकरच ‘ॲनिमल’ या हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकेल. तर या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिका साकारणार आहे. तर बेलमकोंडा श्रीनिवास ‘छत्रपथी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 19:16 IST

संबंधित बातम्या