Rashmika Mandanna Accident : दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवल्यानंतर आपल्या अभिनयाने बॉलीवूडमध्ये स्थान निर्माण करणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सोशल मीडियावर चर्चेत असते. ‘नॅशनल क्रश’ रश्मिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पण गेल्या काही दिवसांपासून रश्मिका सोशल मीडियापासून दूर होती. नुकतीच इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट करत, ती गेले काही दिवस सोशल मीडियापासून दूर का होती, याबाबत तिने माहिती दिली आहे.

रश्मिकाने तिचा एक लहान अपघात झाल्याची माहिती दिली. अपघाताचे अधिक तपशील तिने शेअर केलेले नाहीत, मात्र ती आता बरी असल्याचे सांगितले आहे. या पोस्टमध्ये तिने एक फोटोसुद्धा शेअर केला असून तिने चष्मा घातला केला आहे. केस मोकळे सोडलेले आहेत. तिने कानांवर हात ठेवून हा फोटो काढला आहे. याच पोस्टवर तिने कॅप्शन लिहिली असून त्यात चाहत्यांना आवाहनही केले आहे.

हेही वाचा…राजेश खन्नाऐवजी अमिताभ बच्चन यांना पसंती का दिली? जावेद अख्तर यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “खुशामत करणारे…”

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये रश्मिका लिहिलं, “तुम्ही कसे आहात? गेले काही दिवस मी सोशल मीडियावर नव्हते. मी सार्वजनिक ठिकाणी सुद्धा काही दिवसांपासून दिसले नाही. त्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी माझा एक लहान अपघात झाला होता. पुन्हा नीट बरे होण्यासाठी मला डॉक्टरांनी घरीच राहून आराम करण्याचा सल्ला दिला होता. मी डॉक्टरांचा सल्ला ऐकला आणि घरीच राहिले, आता मी बरी होत आहे. लवकरच मी पूर्वीसारखीच कामात पुन्हा सक्रिय होण्यासाठी सज्ज आहे.”

रश्मिका पुढे आपल्या चाहत्यांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करते. ती लिहिते, “नेहमी स्वतःची काळजी घ्या. आयुष्य खूप लहान आहे, आपल्याला माहीत नाही की उद्या काय होईल, त्यामुळे नेहमी आनंदी राहा.” या पोस्टच्या शेवटी ती लिहिते, “आणि हो, आणखी एक अपडेट, मी खूप लाडू खात आहे.”

हेही वाचा…Video : मृणाल ठाकूरला पडली ‘तांबडी चामडी’ गाण्याची भुरळ, स्टोरी पोस्ट करत म्हणाली, “अनेक गोष्टी आहेत ज्या मला”…

रश्मिकाने ही पोस्ट करताच, तिच्या कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली. एका चाहत्याने लिहिलं, “तू बरी आहेस हे ऐकून खूप आनंद झाला, रश्मिका! नेहमी पुढे जा आणि सकारात्मकता पसरवत रहा.” आणखी एका युजरने लिहिले, “लवकर बरी हो, खचून जाऊ नकोस.” तर एका चाहत्याने लिहिले, “काळजी घे रश्मिका, तू लवकर बरी होशील.”

हेही वाचा…Video: दीपिका पादुकोण-रणवीर सिंग झाले आई-बाबा, मुकेश अंबानींनी दोघांची रुग्णालयात घेतली भेट

रश्मिका गेल्या वर्षी आलेल्या ‘अ‍ॅनिमल’ सिनेमात रणबीर कपूरबरोबर दिसली होती. ती ‘पुष्पा २’ सिनेमात पुन्हा एकदा श्रीवल्लीची भूमिका साकारणार आहे. तसेच सर्वाधिक चर्चा असणाऱ्या ‘छावा’ सिनेमात रश्मिका विकी कौशलबरोबर दिसणार आहे. ती ‘सिकंदर’ सिनेमात सलमान खानसह मुख्य भूमिकेत दिसणार असून, सध्या रश्मिकाकडे बॉलीवूडसह दक्षिणेतील अनेक मोठे सिनेमे आहेत.