Rashmika Mandanna Vijay Deverakonda First Video after Marriage: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा २६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपूर, राजस्थान इथे लग्न केलं. या दोघांचे लग्न उदयपूरमधील ‘आयटीसी मेंमंटस’ (ITC Mementos) इथे झालं. त्यांनी आपल्या संस्कृतींचा मान राखत तेलुगू हिंदू व ‘कोडावा’ अशा दोन वेगवेगळ्या पद्धतीने विवाह केला. सर्वत्र त्यांच्या लग्नाच्या फोटांची चर्चा असतानाच त्यांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.

रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा लग्नानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आहेत. दोघांचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावेळी रश्मिकाने लाल रंगाचा पारंपरिक पंजाबी ड्रेस घातला होता. तर विजयने को-ऑर्ड सेट घातला होता. दोघे एकमेकांचा हात पकडून माध्यमांसमोर आले. त्यांनी हात जोडून सर्वांना नमस्कार केला.

पाहा विजय व रश्मिकाचा व्हिडीओ

दरम्यान, विजय व रश्मिकाच्या लग्नापूर्वी २४ फेब्रुवारीला संगीत सोहळा आणि २५ फेब्रुवारीला हळदी आणि मेहंदीचे कार्यक्रम झाले. या सोहळ्यांमध्ये कुटुंबीय आणि मोजके जवळचे मित्र उपस्थित होते. या दोघांचे रिसेप्शन ४ मार्च २०२६ रोजी हैदराबाद येथील ‘ताज कृष्णा’ हॉटेलमध्ये होणार आहे, ज्यामध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा यांची पहिली भेट ‘गीता गोविंदम’ (२०१८) या चित्रपटाच्या सेटवर झाली. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने आणि केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर ‘डिअर कॉम्रेड’ (२०१९) मध्ये त्यांनी पुन्हा एकदा एकत्र काम केले. या चित्रपटांमधील त्यांच्या केमिस्ट्रीमुळे त्यांच्यातील प्रेमाची चर्चा सुरू झाली.

डिअर कॉम्रेड’च्या प्रमोशन दरम्यान ते अनेकदा एकत्र दिसू लागले. एकमेकांच्या कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहू लागले, तसेच सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करायचे आणि एकत्र फिरायला जायचे. सर्वत्र त्यांच्या नात्याबद्दल चर्चा होत होती, तरीही विजय आणि रश्मिका यांनी नेहमीच एकमेकांना ‘केवळ चांगले मित्र’ म्हणायचे. त्यांनी आपल्या खासगी आयुष्याला शक्य तितके प्रायव्हेट ठेवण्याचा प्रयत्न केला.

दोघांच्या लग्नाच्या मागील काही महिन्यांपासून चर्चा सुरू होत्या. अखेर मागील आठवड्यात दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करून लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलं. त्यांची लव्ह स्टोरी ही एक ‘ऑन-स्क्रीन जोडी’ पासून ‘रिअल-लाईफ जोडी’ पर्यंतचा एक गोड प्रवास राहिला आहे. सध्या या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.