Rashmika Mandanna In Laws South Film Industry : दाक्षिणात्य इंडस्ट्री ते बॉलीवूड असा प्रवास करणाऱ्या रश्मिका मंदानाचं खासगी आयुष्यसुद्धा खूप फिल्मी राहिलं आहे. सध्या अभिनेत्री तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. तिने दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासह २६ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली. दोघांनी पारंपरिक दाक्षिणात्य पद्धतीने लग्न केलं. सध्या दोघांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

‘गीता गोविंदम’ या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम केल्यानंतर रश्मिका व विजय यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली आणि तेव्हापासून या जोडीची सर्वत्र चर्चा होऊ लागली. हे दोघे याच चित्रपटापासून एकमेकांना डेट करत होते अशाही चर्चा आहेत. आता डेटिंगच्या अनेक वर्षांनंतर दोघांनी अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला.

रश्मिका व विजय दोघेही दक्षिणेकडील लोकप्रिय कलाकार आहेत. रश्मिकाला अभिनयाचा कोणताही वारसा नसला तरी तिच्या सासरची मंडळी मात्र दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील मोठं कुटुंब आहे. रश्मिकाचे सासरचे काय करतात, त्यांचा इंडस्ट्रीशी कसा संबंध आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

काय करतात रश्मिकाचे सासरचे?

विजय देवरकोंडा तेलुगू सिनेमातील त्या अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्याने फार कमी कालावधीत स्टारडम मिळवलं आहे. ‘अर्जुन रेड्डी’, ‘गीता गोविंदम’, ‘पेल्ली चूपुलु’, ‘टैक्सीवाला’, ‘डियर कॉमरेड’ आणि ‘खुशी’ यांसारखे हिट चित्रपट त्याने दिले आहेत. विजयच्या कुटुंबीयांबद्दल बोलायचं झालं तर त्याचे वडील गोवर्धन राव देवरकोंडा तेलुगू इंडस्ट्रीतील लोकप्रिय निर्माते आहेत. त्यांनी अनेक तेलुगू चित्रपटांची निर्मिती केली आहे.

विजयच्या आई माधवी देवरकोंडा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर माध्यमांच्या वृत्तानुसार त्या प्रोफेशनल ट्रेनर आहेत आणि कौटुंबिक जबाबदारी सांभाळत आहेत. माधवी यांनी २०१९ मध्ये ‘डियर कॉमरेड’ या रश्मिका व विजय यांच्या चित्रपटात एक छोटीशी कॉलेजमधील प्राध्यापिकेची भूमिकाही साकारलेली.

सासरे निर्माते, सासूबाई गृहिणी आणि रश्मिकाचा दीरसुद्धा अभिनयक्षेत्रात सक्रिय आहे. विजय देवरकोंडाचा धाकटा भाऊ आनंद देवरकोंडा तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेते आहेत, त्यामुळे रश्मिकाची सासरची मंडळी पूर्ण फिल्मी आहे असं म्हणायला हरकत नाही. जिथे निर्माते, कलाकार सगळे एकत्र राहतात आणि स्वत: रश्मिकाही पॅन इंडिया अभिनेत्री आहे. तिने अनेक दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांत काम करत दोन्ही इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

रश्मिकाच्या सासरबद्दल बोलायचं झालं तर विजय देवरकोंडाचं हैदराबादमधील जुबली हिल्समध्ये एक आलिशान घर आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. विजय त्याच्या कुटुंबीयांसह इथे राहतो आणि आता रश्मिकासुद्धा या कुटुंबाचा भाग झाली आहे.