मराठी चित्रपट आणि ‘लावणी नृत्य’ यांचे अगदी ‘एक गाव बारा भानगडी’, ‘केला इशारा जाता जाता’, ‘सांगते ऐका’, ‘पिंजरा’ यापासून ‘नटरंग’ पर्यंत आहे. ‘नटरंग’च्या यशानंतर पुन्हा एकदा लावणीला चांगले दिवस आले असून ब-याच चित्रपटात ‘लावणी नृत्य’ दिसू लागले आहे.
पोस्टर गर्ल’ या चित्रपटात ‘धडात नाही तुमचे बियाणे त्यानेच लावलीया वाट’ या लावणीचा समावेश आहे. ती लावणी रसिका दाभडगावकर हिने साकारली आहे. ती मूळची डोंबिवलीची रहिवाशी असून अभिनय क्षेत्रात काही विशेष कामगिरी करुन दाखवण्यासाठी ती मुंबईची रहिवाशी झाली आहे. यूथ फेस्टिवल, राज्य नाट्य स्पर्धा, संगीत विशरद पदवी, बे दुणे पाच या नाटकात अभिनय असा प्रवास करीत असतानाच सोनाली कुलकर्णी व हेमंत ढोमे यांनी ‘पोस्टर गर्ल’चा लावणी नृत्यासाठी तिचे नाव सुचवले. अभिनयाकडे पाहणारी रसिका नृत्यात माधुरी दीक्षितची चाहती आहे. विविधतेमध्ये तिला प्रियांका चोप्रा आवडते. तर दीपिकाच्या ग्लॅमरचे तिला आकर्षण आहे. मराठी अभिनयामध्ये तिला मुक्ता बर्वे विशेष आवडते.