‘रात्रीस खेळ चाले’ मधील शेवंताचा ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अनेकांना नजरेने घायाळ करणारी शेवंता अर्थात अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर सक्रीय असते.

shevanta
(Photo-Instagram)

छोट्या पडद्यावरीची अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील ‘शेवंता’ च्या भूमिकेमुळे अपूर्वा घराघरांत लोकप्रिय झाली. अनेकांना नजरेने घायाळ करणारी आणि सौंदर्याने प्रत्येकाच्या डोळ्याचं पारणं फेडणारी अपूर्वा सोशल मीडियावर सक्रीय असते. तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत फॅन्सचे मनोरंजन करत असते. तिने शेअर केलेल्या प्रत्येक पोस्टला फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस पडते. अपूर्वा सध्या तिची खास मैत्रीण अभिनेत्री दिक्षा प्रकाश सोबत सुट्ट्या एजॉय करताना दिसत आहे.

अपूर्वाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. अपूर्वाने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अपूर्वा आणि तिची दिक्षा ‘जाने क्यु’ या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यात दोघीनी पांढऱ्या रंगाचा बाथरोब परिधान केला आहे. दिक्षा प्रकाशला टॅग करत  कॅप्शन दिलं, ” तुझ्यासोबत आठवणी तयार करणं हा माझा आवडीचा छंद आहे.” तिच्या या व्हिडीओला हजारत लाइक्स मिळत आहेत. चाहते कमेंट करुन त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

अपूर्वाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात, दरम्यान अपूर्वाने ‘आभास हा’ या मालिकेतून कलाविश्वामध्ये पदार्पण केलं आहे. या मालिकेनंतर ‘आराधना’, ‘एकापेक्षा एक’,’तू माझा सांगाती’ या मालिकांमध्ये काम केलं. तसंच तिने ‘चोरीचा मामला’, ‘आलाय मोठा शहाणा’ या नाटकांमध्येही काम केलं आहे. इतकंच नाही तर ती काही जाहिरांतींमध्येही झळकली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ratris khel chale fame shevanta aka actress apurva nemlekar instagram video went viral aad

ताज्या बातम्या