प्रतिक्षा संपली! ‘रात्रीस खेळ चाले 3’ या दिवशी येणार भेटीला

अण्णा नाईक येणार या दिवशी भेटायला तुम्ही तयार आहात ना?

गूढ आणि थराराने परिपूर्ण अशी मालिका म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले.’ झी मराठी वाहिनीवरील या मालिकेच्या दोन्ही भागांनी, ‘रात्रीस खेळ चाले’ आणि ‘रात्रीस खेळ चाले २’ने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले होते. आता त्याच्या तिसऱ्या भागाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसून येत आहे.

झी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अण्णा नाईक यांची बंदुक दिसत आहे. सोबतच पुन्हा गोळी सुटणार अण्णा नाईक पुन्हा येणार असे त्या पोस्टर वर लिहीले आहे. या मालिकेतील अण्णा नाईक, शेवंता, दत्ता, माधव, पांडू, वच्छी या पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंंकली. मात्र, अण्णा नाईक या भूमिकेने तर सगळ्यांच्या मनात एक भीती निर्माण केली आहे. आता या दोन्ही भागांतील पात्र तिसऱ्या भागात कोणत्या रूपात आपल्याला भेटायला येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. सगळ्या प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम पाहता या मालिकेचा तिसरा भाग आणण्याचा निर्णय वाहिनीने केला आहे. या मालिकेचा तिसरा भाग हा २२ मार्चपासून रात्री ११ वाजता झी मराठी या वाहिनीवर पाहता येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

या आधी झी मराठीने या मालिकेतील तिसऱ्या भागाचा एक प्रोमो देखील शेअर केला होता. या प्रोमोमध्ये अण्णा नाईक भूत असल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये प्रॉपर्टीसाठी घरात सुरु असलेले राजकारण, खून प्रकरण हे सर्व काही दाखवण्यात आले होते. त्यानंतर ‘रात्रीस खेळ चाले २’मध्ये २० वर्षांपूर्वीची कहाणी दाखवण्यात आली होती. या भागातील अण्णा नाईक आणि शेवंताच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर जणू काही जादूच केली होती. पण मालिकेच्या शेवटी शेवंता आणि अण्णा यांचा मृत्यू होतो. त्यामुळे आता ‘रात्रीस खेळ चाले ३’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ratris khel chale season 3 will starts on 22 march 2021 dcp