रवीना टंडनने केला ‘नाइट सूट’मध्ये करवा चौथ साजरा, पाहा फोटो

रवीनाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

raveena tandon, karwa chauth,
रवीनाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीना सध्या चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी तिचे लाखो चाहते आहेत. रवीना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. रवीनाने करवा चौथचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

त्याचे फोटो रवीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. रवीनाने यावेळी व्हर्च्युअली करवा चौथ साजरा केला आहे. आपण नेहमी पाहिले आहे की लाल रंगाची साडी किंवा मग ड्रेस परिधान करत स्त्रीया करवा चौथ साजरा करतात. मात्र, यावेळी रवीनाने मेहंदी रंगाचा नाइट ड्रेस परिधान केल्यासारखे दिसत आहे. यात रवीनाने याच नाइट सूटमध्ये रवीनाने लाल रंगाचा ड्रेस ठेवला आहे.

आणखी वाचा : Sacred Games: नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत इंटिमेट सीन शूट केल्यानंतर रडू कोसळलं, कुब्रा सैतने केला खुलासा

आणखी वाचा : “केमोथेरपी सुरु असताना देखील अंतिमचे चित्रीकरण केले पूर्ण”, महेश मांजरेकरांनी केला खुलासा

एवढंच काय तर रवीनाने पूजा देखील त्याच नाइट सूटवर केली. रवीना नेहमीच अनिल कपूर यांची पत्नी सुनीता कपूर यांच्यासोबत करवा चौथ साजरा करताना दिसते. मात्र, यावेळी पहिल्यांदा रवीना तिच्या घरी करवा चौथा साजरा करत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Raveena tandon celebrate karwa chauth in night suit photo went viral dcp

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या