फराह खान, रवीना टंडन आणि भारती सिंह विरुद्ध गुन्हा दाखल

अजनाला येथे त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन, चित्रपट निर्माती फराह खान आणि कॉमेडियन भारती सिंह यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. त्यावरुन या तीन लोकप्रिय अभिनेत्रींविरोधात पंजाब येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका कार्यक्रमादरम्यान या तिघींनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

‘द ट्रिब्यून’ने दिलेल्या वृत्तानुसार रवीना, फराह आणि भारतीने एका कॉमेडी कार्यक्रमादरम्यान धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी तक्रार देण्यात आली होती. त्यांनी वापरलेले शब्द धर्माचा अपमान करतात असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हा भाग ख्रिसमसच्या मूहुर्तावर प्रदर्शित झाला. तक्रारीवरुन अजनाला येथे त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस या कार्यक्रमाच्या व्हिडीओची तपासणी करत आहे. भादंवि कलम २९५- अ नुसार तिघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक विक्रम जीत दुग्गल यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे..

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Raveena tandon farah khan and bharti singh booked for hurting religious sentiments avb