“मी कित्येक जणांचे टोमणे ऐकलेत”; रवीना टंडनचा ‘त्या’ निर्णयाबद्दल खुलासा

रवीनाने वयाच्या २१ व्या वर्षी दोन मुली दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता.

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीनाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. रवीना फक्त तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या बेधडकपणे बोलण्यासाठी ही ती ओळखली जाते. सध्या रवीना ही तिच्या आगामी ‘आरण्यक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रवीना टंडन ही अशा बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जिने मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे रवीनाने वयाच्या २१ व्या वर्षी दोन मुली दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी छाया ही ११ वर्षांची आणि पूजा ही ८ वर्षांची होती. मात्र या दोन्ही मुलींना दत्तक घेणे फार कठीण होते. यामुळे तिला कित्येक जणांचे टोमणे ऐकावे लागले आहेत, असा खुलासा रवीनाने एका मुलाखतीदरम्यान केला होता.

नुकंतच रवीनाने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान तिला छाया आणि पूजाबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी तिने मुली दत्तक घेण्याच्या निर्णयापासून त्यांचे पालनपोषण करण्याच्या जबाबदारीपर्यंत सर्व गोष्टींवर खुलासा केला. “ही संपूर्ण घटना १९९४ प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ चित्रपटापूर्वीची आहे. मी आणि माझी आई दर आठवड्याच्या शेवटी म्हणजेच वीकेंडला आशा सदनसारख्या अनेक अनाथाश्रमात जायचो. काही वर्षांनी माझ्या चुलत भावाचे निधन झाले. त्याला छाया आणि पूजा अशा दोन मुली होत्या. मात्र त्यांचे कुटुंबिय त्या दोन्ही मुलींशी फार वाईट प्रकारे वागत होते. त्यांचे वागणे मला अजिबात आवडले नाही. त्यामुळे मी त्यांना माझ्यासोबत घरी आणले,” असे रवीना म्हणाली.

“मी त्यांना घरी आणतेवेळी फारसा विचार केला नाही. मला त्या दोघींना असे जीवन द्यायचे होते, ज्याच्यावर त्यांचा हक्क होता. मी अब्जाधीश नाही पण माझ्याकडून जमेल ती मदत मी करते,” असेही तिने सांगितले.

रवीनाने १९९४ मध्ये पूजा आणि छाया या दोन मुलींना दत्तक घेतले. त्यानंतर जवळपास दहा वर्षांनी २००४ मध्ये तिने चित्रपट निर्माते अनिल थडानी यांच्याशी लग्न केले. ती पूजा आणि छायासोबतच १४ वर्षांची मुलगी राशा आणि ११ वर्षांचा मुलगा रणबीर यांचीही आई आहे. रवीना गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. काही दिवसांपूर्वी रविना ही आजी झाली आहे. छायाने काही दिवसांपूर्वी एका मुलाला जन्म दिला आहे. तिच्या मुलाचे नाव रुद्र असे आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Raveena tandon had adopted two daughters at the age of 21 know story behind it nrp

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या