“आम्ही संपूर्ण चित्रपट भांडण करत संपवला अन्…”, रवीनाने सांगितला सलमानसोबत काम करण्याचा अनुभव

रवीनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा अनुभव सांगितला आहे.

raveena tandon, salman khan,
रवीनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा अनुभव सांगितला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीनाचे लाखो चाहते आहेत. रवीनाने नुकताच तिचा ४७ वा वाढदिवस साजरा केला आहे. रवीना सध्या तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत एलएमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. यावेळी रवीनाने तिच्या करिअरच्या सुरुवातीला तिला किती स्ट्रगल करावे लागले या विषयी सांगितले आहे.

रवीनाने नुकतीच ‘पिंक व्हिला’ला मुलाखत दिली होती. यावेळी तिने तिच्या करिअरच्या संघर्षाच्या दिवसांविषयी सांगितले आहे. रवीनाने आता पर्यंत अनेक भूमिका साकरलेल्या आहेत. रवीनाने अनेक अभिनेत्यांसोबत बऱ्याचवेळा काम केले आहे. त्यापैकी एक म्हणजे सलमान खान. रवीना आणि सलमानने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र देखील आहेत.

आणखी वाचा : ५ हजार कोटी रुपयांचा मालक असूनही ‘या’ कारणामुळे मुलांना एक रुपयाही देऊ शकत नाही सैफ

याच निमित्ताने सलमानसोबत काम करण्याच अनुभव रवीनाने सांगितला आहे. “आम्ही शाळेत असलेल्या मुलांसारखे होतो ज्यांना प्रत्येक गोष्टीत भांडायचं होतं. मी साडेसोळा वर्षांची होते आणि सलमान २३ वर्षांचा होता. आम्ही हट्टी होतो. सलमान आणि मी सारख्याच स्वभावाचे आहोत, आम्ही जवळ जवळ एकाच घरात मोठे झालो. कारण सलीम काका आणि माझे वडील एकत्र काम करायचे. जणू काही घरातूनच आमची भांडण सुरु झाली होती. आम्ही संपूर्ण चित्रपट भांडण करत संपवला आणि त्यानंतर सलमान म्हणाला मी तिच्यासोबत काम करणार नाही, आणि त्यानंतर आम्ही अंदाज अपना अपना या चित्रपटात काम केले,” असे रवीना म्हणाली.

आणखी वाचा : Photo : ‘मुळशी पॅटर्न’चे चाहते जेव्हा ‘अंतिम’चा ट्रेलर बघतात तेव्हा…, सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव

आणखी वाचा : “चोराला सोडून संन्याशाला फाशी…”,समीर वानखेडे यांच्या प्रकरणात मेघा धाडे संतापली

रवीनाने सलमानसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात ‘पत्थर के फूल’, ‘अंदाज अपना अपना’, ‘कही प्यार ना हा जाए’ आणि बरेच चित्रपट आहेत. दरम्यान, सलमानचा ‘अंतिम’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Raveena tandon making debut salman khan we fought throughout film dcp

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या