scorecardresearch

…म्हणून रवीना टंडनने घेतली होती सलमान खानसोबत कधीही काम न करण्याची शपथ

रवीनाने सलमानसह अनेक अभिनेत्यांसोबत बऱ्याचदा काम केले आहे.

बॉलिवूडमध्ये कलाकारांचे एकमेकांशी नेहमी काही ना काही वाद होताना दिसतात. हे वाद झाल्यानंतर अनेक कलाकार एकमेकांशी काम करणे बंद करतात. या यादीत बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडना आणि सलमान खान यांचाही समावेश आहे. बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि सलमान खान अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण एक वेळ अशी आली जेव्हा त्या दोघांनीही एकमेकांसोबत काम करण्यास नकार दिला होता. विशेष त्या दोघांनीही एकमेकांसोबत काम न करण्याची शपथ घेतली होती.

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीनाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. रवीना टंडन ही तिच्या सौंदर्यासाठी संपूर्ण इंडस्ट्रीत खूप प्रसिद्ध आहे. तिचे चाहते तिच्या सौंदर्याचे आणि फिटनेसचे वेडे आहेत. ८० ते ९० च्या दशकात तिने तिच्या अभिनयामुळे प्रत्येकालाच वेड लावले होते. रवीनाने आतापर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत. रवीनाने सलमानसह अनेक अभिनेत्यांसोबत बऱ्याचदा काम केले आहे.

नुकतंच रवीनाने टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने याबाबतची माहिती दिली. त्यावेळी मी आणि सलमान नेहमी एकमेकांसोबत भांडत असायचे. एकमेकांना बघितलं तरी आमच्यात खटके उडायचे. त्यावेळी आम्ही प्रत्येक गोष्टींवरुन वाद घालायचो. कधी कधी तर आमच्या इतके टोकाचे भांडण व्हायचे की चित्रपटाचे दिग्दर्शक आमच्यावर नाराज व्हायचे, असे ती म्हणाली.

यापुढे रवीनाने एका चित्रपटातील किस्सा सांगितला. यावेळी ती म्हणाली की, आम्ही फूल और पत्थर या चित्रपटात एकत्र काम केले होते. यादरम्यानही आमच्यात इतके भांडण झाले की आम्ही दोघेही यापुढे एकत्र काम करणार नाही, अशी शपथ घेतली होती. त्यानंतर आम्ही दोघांनी अंदाज अपना अपना या चित्रपटात काम केले. यावेळी त्यांनी ही शपथ मोडली.

‘पुष्पा’ चित्रपटातील केवळ तीन मिनिटांच्या आयटम साँगसाठी समांथाने आकारले कोट्यावधी, मानधनाची रक्कम माहितीये का?

“या चित्रपटात आम्ही एकत्र काम केले असले तरी आमची भांडण संपली नव्हती. आम्ही त्या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान नेहमी भांडत असायचो. त्यावेळी दिग्दर्शकही आमच्यावर वैतागायचे. त्यामुळेच आम्ही दोघांनी एकत्र फार कमी चित्रपट केले आहेत.” असेही तिने सांगितले. विशेष म्हणजे यानंतर रवीनाला १९९९ मध्ये हम साथ साथ है या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. मात्र तिने या चित्रपटात काम करण्यास स्पष्ट नकार दिला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raveena tandon reveals why salman khan vowed to never work with her after patthar ke phool nrp

ताज्या बातम्या