प्रेक्षकांना सहज आपलस करणार आणि त्यांची अचूक नस ओळखणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक रवि जाधव आपल्या चांगलाच परीचयाचा आहे. त्याची प्रस्तुती असलेल्या आगामी ‘ & जरा हटके’ या सिनेमाबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. आजच्या मॉडर्न जगात नात्यामध्ये बदलत चाललेली भावनिकता आणि त्यातून दोन पिढ्यांमध्ये घातलेली सांगड या सिनेमात जरा हटके पद्धतीने मांडली आहे. ‘&’ हे अक्षर मुळात दोन भिन्न गोष्टी जोडणारे असून नात्यांना पूर्णत्व मिळवून देणारे आहे. तेच पूर्णत्व हा सिनेमा पाहताना प्रेक्षक नक्कीच अनुभवतील. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना नव्या युगातील वेगाने बदलत असलेल्या नात्यांतील गुंतागुंत जरा हटके पद्धतीने सादर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. नुकताच या सिनेमाचा लोगो अनेक मान्यवरांनी ट्विट करुन तो अतिशय वेगळा व नाविन्यपूर्ण असल्याची पोच पावती दिल्याची माहिती रवि जाधवने दिली. इरॉस इंटरनॅशनल आणि रवि जाधवची सहनिर्मिती असलेल्या ‘& जरा हटके’ या सिनेमाचे लेखन मिताली जोशीने केले असून दिग्दर्शन प्रकाश कुंटेने केल आहे.



