‘माझ्याशी लग्न करशील?’; बिग बॉसच्या घरात राहुलने केलं प्रेयसीला प्रपोज

राहुल वैद्यची प्रेयसी कोण माहित आहे का?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस १४ सध्या चांगल्याच रंजक वळणार आला आहे. या शोमध्ये काही स्पर्धकांनी वाइल्ड कार्ड एण्ट्री घेतली आहे. त्यामुळे पुन्हा घरात नवीन वाद, टास्क रंगत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस हा शो चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात अनेक नवीन नाती जुळल्याचं याआधी झालेल्या पर्वात दिसून आलं आहे. या पर्वातदेखील असंच काहीसं घडताना दिसत आहे. मात्र, यंदा बिग बॉसच्या घरात राहून एका स्पर्धकाने कार्यक्रम सुरु असतानाच त्याच्या प्रेयसीला थेट लग्नाची मागणी घातली आहे.

इंडियन आयडॉल या रिअॅलिटी शोमधून प्रसिद्धीझोतात आलेला गायक राहुल वैद्य सध्या बिग बॉस१४ मध्ये सहभागी झाला आहे. अनेकदा टास्क खेळण्याची पद्धत आणि घरातील वादाचं मुख्य कारण ठरलेला राहुल हा सध्या सोशल मीडियावर चर्चिला जात आहे. अलिकडेच त्याने बिग बॉसच्या घरात राहून त्याच्या प्रेयसीला हटके पद्धतीने थेट लग्नाची मागणी घातली आहे.

राहुल गेल्या काही काळापासून अभिनेत्री दिशा परमार हिला डेट करत आहे. सध्या तो बिग बॉसच्या घरात असून दिशाला प्रचंड मिस करत असल्याचं दिसून येत आहे. यामध्येच त्याने हटके पद्धतीने दिशाला लग्नाची मागणी घातली आहे.

आणखी वाचा- Bigg Boss : ‘या’ स्पर्धकाला करावा लागला आर्थिक संकटाचा सामना, म्हणाला…

“आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्या आयुष्यात दिशा परमार ही मुलगी आहे. पण मला माहित नाही, ‘तुझ्यावर प्रेम आहे’, हे सांगायला मला इतका वेळ कसा काय लागला. माझ्याशी लग्न करशील का?. मी तुझ्या उत्तराची वाट पाहतोय. असं म्हणत राहुलने दिशाला प्रपोज केलं आहे.
दरम्यान, कलर्स टीव्हीने त्यांच्या इन्स्टाग्रामवर राहुलचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे सध्या राहुलचा हा व्हीडओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उत्तम आवाजाच्या जोरावर राहुलने अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळेच त्याच्या आयुष्यात असलेली दिशा परमार नेमकी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Reality show bigg boss14 watch singer rahul vaidya goes down on his knee to propose ladylove disha parmar for marriage ssj