प्रकाश राज यांनी पहिल्या पत्नीला का दिला घटस्फोट? जाणून घ्या

त्यानंतर १२ वर्षांनी लहान कोरिओग्राफरशी केले दुसरे लग्न

prakash raj, lalitha kumari, prakash raj divorce,
प्रकाश राज यांनी अभिनेत्री ललिताशी १९९४ साली लग्न केले होते.

खलनायकी भूमिका साकारुनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे अभिनेते म्हणजे प्रकाश राज. प्रकाश राज नेहमी चर्चेत असतात. कधी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे तर कधी सोशल मीडियावर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. प्रकाश राज यांनी अभिनेत्री ललिताशी १९९४ साली लग्न केले होते. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. त्यानंतर त्यांनी त्यांच्यापेक्षा वयाने लहान कोरिओग्राफरशी लग्न केले. पण प्रकाश राज यांचा घटस्फोट का झाला? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला जाणून घेऊया..

प्रकाश राज आणि ललिता यांना दोन मुली आहेत. मेघना आणि पूजा. तसेच त्यांना एक मुलगा देखील होता. पण २००४ रोजी सिद्धूचे वयाच्या ५व्या वर्षी निधन झाले. त्याच्या निधनानंतर ललिता आणि प्रकाश राज यांचे पूर्ण आयुष्य बदलले. सिद्धू पतंग उडवत असताना पडला आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. ललिता यांना सिद्धूच्या निधनानंतर मोठा धक्का बसला. त्यानंतर प्रकाश राज आणि ललिता यांच्यामध्ये वाद सुरु झाले. या घटनेनंतर ५ वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला.

आणखी वाचा : १२ वर्षांनी लहान कोरिओग्राफरशी प्रकाश राज यांनी केले लग्न, जाणून घ्या लव्हस्टोरी

त्यानंतर प्रकाश राज यांनी त्यांच्या पेक्षा १२ वर्षांनी लहान कोरिओग्राफर पोनी वरमा यांच्याशी लग्न केले. सुरुवातीला त्यांच्या या लग्नाला त्यांच्या मुलींनी नकार दिला होता. पण पोनी यांना भेटल्यानंतर त्यांनी होकार दिला असल्याचे म्हटले जाते. एका मुलाखतीत प्रकाश राज यांनी सांगितले होते की, “पोनी माझ्या एका चित्रपटासाठी कोरिओग्राफी करत होती. मी माझ्या आई व मुलींना तिच्याविषयी सांगितले. तिच्याशी लग्न करायची इच्छा त्यांना बोलून दाखवली. लग्नापूर्वी पोनी आणि माझ्या मुलींची भेट घालून दिली. मुलींची परवानगी घेतल्यानंतर मी पोनीच्या वडिलांची भेट घेतली आणि तिला लग्नाची मागणी घातली.”

‘वॉटेंड’, ‘सिंघम’, ‘दबंग’, ‘बुड्ढा होगा तेरा बाप’, ‘भाग मिल्खा भाग’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये प्रकाश राज यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Reason behind prakash raj divorce with first wife lalitha kumari avb

ताज्या बातम्या