नागराज मंजुळे यांचा ‘फॅन्ड्री’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटातून ग्रामीण महाराष्ट्राचं धगधगतं समाजवास्तव प्रेक्षकांसमोर मांडलं. या चित्रपटातील जब्या आणि शालूच्या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘फँड्री’चित्रपटातील शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राजेश्वरी खरात हिची ‘रेड लाईट’ नावाची एका शॉर्ट फिल्म नुकतंच रिलीज झाली. यात ‘रेडलाईट’ परिसरात काम करणाऱ्या महिलांबाबतचे विदारक वास्तव्य मांडण्यात आलं आहे. नुकतंच राजेश्वरीने याबाबत एक भावनिक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

“तो आला, बसला, आणि गेला पण सर्वांच्या नजरा मात्र तिच्यावरच अडल्या. स्त्रीने असे काम करणे योग्य नव्हे. परंतु पुरुषाने केलेले अतिउत्तम. काही काम धंदा का करीत नाहीस, फक्त पैश्यांसाठी लाचारीचे सोंग घेतीस. पण तुम्ही तुमच्या घरात धुणे भांड्याचे तरी काम देताल का एवढेच सांगा, आणि जरी काम दिले तरी त्या मागचा हेतू हा सर्वांनाच माहिती असतो. गल्लीकडे येताना तोंड लपवून येतात पण येतात मात्र नक्की. थोडावेळसाठीच खेळणं घेतल्यासारखं आमची आबरू काढून घेता आणि मोबाईलच्या रिचार्ज पेक्षा कमी किंमत देता. सर्वांना हे खेळण आयुष्यात एकदातरी पाहिजे असतच पण कोणी याला कायमच आपलं करून घेण्याची हिंमत ठेवतात का? नाही, कारण वेश्या व्यवसाय करणारी स्त्री चारित्र्यहीन असते आणि बाकीचे सर्व अगदीच पवित्र असतात,” अशा शब्दात राजेश्वरीने या सर्व गोष्टींवर टीका केली आहे.

Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
Vasai, Fake Doctor, Wrong Surgery, Leads to Death, woman, Social Activist, marathi news, maharashtra,
वसई : बोगस डॉक्टरने घेतला महिलेचा बळी; चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे महिला ४ वर्षे अंथरूणात

“समाजात आणखी बर्‍याच काही गोष्टी वेश्येबद्दल बोलल्या जातात पण कोणी मात्र कधी त्यांच्या हितात बोलत नाही, सर्वजण फक्त ऐकून मजा घेतात. कृपया थोडीफार दया त्यांच्यावरही करा. ज्या आपल्या घरातील माता भगिनींसारखे आयुष्य कधीच जगू शकत नाहीत,” अशी विनंतीही तिने तिच्या या पोस्टमधून केली आहे.

दरम्यान राजेश्वरी खरातने नुकतंच रेडलाईट नावाच्या एका शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे. यात रेड लाईट परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांबाबतचे विदारक चित्र मांडले आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी युट्यूबवर ही शॉर्ट फिल्म प्रदर्शित करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांनी तिने ही पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची ही पोस्ट फार व्हायरल होत आहे.