‘मानधनाच्या नावावर मला तूटपुंजी रक्कम देण्यात येत होती’

निर्मात्यांचं उत्तरसुद्धा तिच्यासाठी धक्कादायक होतं.

sonam kapoor
सोनम कपूर

बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींना अभिनेत्यांच्या तुलनेत कमी मानधन दिलं जातं, असं अनेकदा म्हटलं जातं. चित्रपटसृष्टीतील लिंगभेदावर नेहमीच आवाज उठवणाऱ्या सोनम कपूरसोबतंही अशीच एक घडना घडली. आपल्याला दिलेली ऑफर अपमानास्पद असल्याचं म्हणत चित्रपटाला साफ नकार दिल्याचा तिने खुलासा केला.

यासंदर्भात सोनम म्हणाली की, ‘त्या चित्रपटासाठी मी फार उत्सुक होते पण मानधनाची रक्कम ऐकून मला धक्काच बसला. निर्मात्यांना मी फोन केला. हे अत्यंत अपमानास्पद असल्याचं त्यांना सांगितलं. गेल्या दहा वर्षांपासून मी या इंडस्ट्रीत काम करतेय. मागच्या वर्षी ‘नीरजा’सारखा सुपरहिट चित्रपट मी दिला. मग इतकं कमी मानधन देण्याचा विचार कसा केला, असा प्रश्नही मी त्यांना विचारला. त्यावर त्यांचं उत्तरसुद्धा तितकंच धक्कादायक होतं. याआधी एका सुपरस्टारला घेऊन आम्ही चित्रपटाची निर्मिती केली. पण आमच्या पदरी निराशाच आली. त्यामुळे आता आम्ही जास्त मानधन देऊ शकत नाही, हे उत्तर त्यांच्याकडून मिळालं.’

वाचा : विरुष्काच्या लग्नाबाबत जॅकलिनने केला नवा खुलासा

निर्मात्यांकडून मिळालेल्या उत्तरानंतर सोनमने त्यांच्या चित्रपटासाठी साफ नकार दिल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे चित्रपटसृष्टीत प्रगती साधायची असल्यास अभिनेत्रींनी एकमेकांची साथ द्यायला हवी असंही ती म्हणाली. कमी मानधनामुळे चित्रपटाला नकार दिल्यास त्याजागी दुसऱ्या अभिनेत्री काम करण्यास तयार असतात. अशा वेळी सर्वांनी मिळून याविरोधात आवाज उठवला पाहिजे, असं सोनम म्हणाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rejected film recently because i was getting paid shit said sonam kapoor