अभिनेत्री रेखा यांच्या सौंदर्याने ‘गुम है किसी के प्यार में’च्या नव्या प्रोमोला लावले चार चाँद!

रेखा यांचे छोट्या पडद्यावर पदार्पण

सौंदर्य आणि कला यांचा अनोखा संगम म्हणजे रेखा! सौंदर्य, अभिनय आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी मजल मारली. आजही त्या तेवढ्याच सुंदर आणि उत्साही दिसतात. बॉलिवूडमध्ये आपल्या सदाबहार अभिनयाने आतापर्यंत अधिराज्य गाजवत आलेल्या रेखा यांनी ‘गुम है किसी के प्यार में’ मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. रेखा यांनी मालिकेचा पहिला प्रोमो शूट केला आणि तो हिट ठरला.

स्टारप्लस वाहिनीने ‘गुम है किसे के प्यार में’ या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये रेखा त्यांच्या आवाजात मालिकेतील सई आणि विराटच्या कथा सांगताना दिसत आहेत. विराट आणि सईला आपल्या प्रेमाची जाणीव होईल का? असे त्या बोलताना दिसत आहेत. या प्रोमोमध्ये त्या अतिशय सुंदर दिसत असून त्यांनी कांजीवरम साडी परिधान केली आहे. तसेच त्यांना प्रोमोमध्ये पाहून चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by StarPlus (@starplus)

‘गुम है किसे के प्यार में’ या मालिकेत एका पोलीस ऑफिसरची लव्ह स्टोरी दाखवण्यात येणार आहे. या मालिकेत निल भट्ट, आयेशा सिंग आणि ऐश्वर्या वर्मा हे कालाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तसेच मराठमोळ्या अभिनेत्री किशोरी शहाणे देखील महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. आता मालिकेत एक नवा ट्विटस्ट आला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये मालिकेबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rekha marks her small screen debut with ghum hai kisikey pyaar meiin serial avb

Next Story
गॉसिप