लोकप्रिय तेलुगू अभिनेत्री रेणुका देसाई ही रेणू देसाई म्हणूनही ओळखली जाते. रेणुका तेलुगू स्टार आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची दुसरी पत्नी होती. रेणुकाला नुकतंच पवन कल्याण यांच्या चाहत्यांनी ऑनलाइन ट्रोल केलं. एका चाहत्याने तिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट केल्यावर तिने त्याला उत्तर दिलं आहे.

पवन कल्याण यांच्याशी लग्न केल्यावर त्यांनी थोडा धीर धरायला हवा होता, असं त्या युजरने लिहिलं आणि पवण कल्याण देवासारखे आहेत, असं तो म्हणाला. या युजरला नंतर रेणुकाने उत्तर दिलं. पवाण कल्याण यांनीच लग्न मोडलं आणि आपल्याला सोडल्यानंतर तिसरं लग्न केलं, असं रेणुकाने त्या युजरला म्हटलं. यावेळी तिने लोकांना खोटी आणि दुखावणारी विधानं करू नये, असंही सांगितलं.

तीन लग्नं, दोन घटस्फोट अन् तिसरी पत्नी रशियन; फिल्मी आहे दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण यांचं खासगी आयुष्य

“वहिनी, तुम्ही थोडा अजून धीर धरायला हवा होता. तुम्ही देवासारख्या एका माणसाला समजून घेतलं नाही. पण कदाचित आता तुम्हाला त्यांची किंमत कळाली असेल. मला आनंद आहे की मुलं पवन कल्याण यांच्याबरोबर आहेत,” अशी कमेंट चाहत्याने रेणुकाच्या पोस्टवर तेलुगूमध्ये केली होती. उत्तर देताना रेणुकाने लिहिलं, “जर तुमच्याकडे बुद्धी असती, तर तुम्ही अशी मूर्खासारखी कमेंट केली नसती. त्यानेच मला सोडलं आणि नंतर पुन्हा लग्न केलं. त्यामुळे कृपया अशा टिप्पण्या करू नका, कारण त्याचा मला फक्त त्रासच होतो.” चाहत्याला असं उत्तर दिल्यानंतर रेणुकाने सर्व कमेंट्स डिलीट केल्या आणि कमेंट सेक्शन बंद केलं.

लोकप्रिय अभिनेत्रीने अवघ्या २४ व्या वर्षी घेतलं मुंबईत घर, काही दिवसांपूर्वीच घेतली मर्सिडीज, पूजेचे फोटो केले शेअर

रेणू देसाई आणि पवन कल्याण यांनी २००९ मध्ये लग्न केलं होतं आणि तीन वर्षांच्या संसारानंतर ते २०१२ मध्ये विभक्त झाले. त्यांना अकिरा नावाचा मुलगा आणि आध्या नावाची मुलगी आहे. अकिरा आपल्या वडिलांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना सक्रियपणे पाठिंबा देत आहे, तर आध्या अलीकडेच तिच्या वडिलांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेली होती.

महाराष्ट्राच्या दिवंगत माजी मुख्यमंत्र्यांची नात आहे ‘मुंज्या’तील अभिनेत्री, कतरिना कैफच्या दिराशी जोडलं जातंय नाव

दोन घटस्फोटानंतर पवन कल्याण यांची भेट रशियन मॉडेल आणि अभिनेत्री ॲना लेझनेवा हिच्याशी झाली. दोघे चित्रपटाच्या सेटवर भेटले आणि शूटिंगदरम्यान जवळ आले आणि घटस्फोटाच्या एका वर्षानंतर २०१३ मध्ये त्यांनी लग्न केलं. पण रेणुका देसाईने घटस्फोटानंतर पुन्हा लग्न केलं नाही. पवन कल्याण यांच्या चाहत्यांकडून रेणुकाला पहिल्यांदाच अशाप्रकारे ऑनलाइन द्वेषाचा सामना करावा लागलेला नाही. यापूर्वी अनेकदा तिला पवन कल्याण यांच्या चाहत्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या. खासकरून जेव्हा तिने तिच्या दुसऱ्या साखरपुड्याची बातमी शेअर केली, तेव्हा तिला द्वेषाचा सामना करावा लागला होता. मात्र तिने मुलांसाठी दुसरं लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि साखरपुडा मोडला होता.