तुरुंगामधील टॉयलेट वापरावं लागू नये म्हणून…; आर्यन खानमुळे तुरुंग कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढलं

गेल्या ८ ऑक्टोबरपासून आर्यन हा आर्थर रोड जेलमध्ये आहे.

shah rukh khan son aryan khan, aryan khan not drinking enough water, aryan khan health in jail, aryan khan crying in jail, aryan khan avoiding using the washroom,

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहे. क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. आर्यनच्या जामीन याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. त्याचा तुरुंगवास संपायची चिन्हे दिसत नाहीत. मन्नत या आलिशान बंगल्यात राहणारा आर्यन सध्या तुरुंगात आहे. आर्यनने तुरुंगात राहून खाणं पिणं कमी केले आहे जेणेकरुन टॉयलेटचा वापर कमी होईल. त्यामुळे तुरुंगातील कर्मचाऱ्यांचे आर्यनच्या प्रकृतीबाबत टेन्शन वाढले आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आर्यनसोबत असणाऱ्या एका कैदीने आर्यनला रडताना पाहिले आहे. आर्यन तुरुंगात बसून रडत असल्याची त्याने माहिती दिली आहे. तसेच तुरुंगातील अधिकाऱ्यांना आर्यनच्या प्रकृतीची चिंता सतावत आहे. कारण आर्यनने तुरुंगातील टॉयलेट वापरावं लागू नये म्हणू पाणी पिण्यास, खाणे खाण्यास नकार दिला आहे. स्टारकिड असल्यामुळे आर्यनला जेलमध्ये कोणत्याही विशेष सुविधा दिल्या जात नसल्याचे यापूर्वी समोर आले होते. आर्यनला इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक दिली जात आहे. आर्यन गेल्या काही दिवसांपासून बिस्किट खात असल्याचे म्हटले जात आहे.
आणखी वाचा : मन्नतवर पोहोचलेल्या NCB अधिकाऱ्यांना शाहरुख म्हणाला, “तुम्ही चांगलं काम करताय, पण आर्यनला…”

जेलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेलमध्ये सुरुवातीला आर्यन काहीही न खाता पिता शांत एका कोपऱ्यात बसलेला असायचा. मात्र आता त्याच्या दिनक्रमात थोडासा बदल झाला आहे. जामीन मिळेल या आशेवर असलेला आर्यन जेलमध्ये होणाऱ्या आरतीमध्ये सहभागी होत आहे. तसेच आरती संपेपर्यंत तो त्या ठिकाणी असतो, अशीही माहिती समोर येत आहे.

गेल्या ८ ऑक्टोबरपासून आर्यन हा आर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यन खानला जामीन मिळावा यासाठी वकिलांकडून पुरेपूर प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत सलग सहा ते सात वेळा आर्यनच्या जामीनावर सुनावणी झाली असली तरी त्याला जामीन मिळालेला नाही. त्यामुळे साधारण १९ दिवसांपासून आर्यन खान आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे. त्याला जेल मधील खाणे-पिणे आवडत नाही. त्यामुळे तो ते खात नसल्याचे बोललं जात आहे. तसेच तो बरॅकच्या बाहेरही येत नव्हता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Reportedly aryan khan crying inside his cell and not drinking enough water avoiding using the washroom avb

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या