संपूर्ण देशामध्ये सध्या ६८ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशवासियांसोबतच विविध क्षेत्रातील दिग्गज, कलाकारमंडळींनीसुद्धा त्याच्या सोशल मीडियावरील अकाऊंटद्वारे चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवरुन तिरंग्याचे काही फोटो शेअर करत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एकिकडे अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर, बोमन इराणी, अनिल कपूर, अनुष्का शर्मा आणि इतर कलाकारांनीही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

परफेक्शनिस्ट आमिर खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर, झक्कास अभिनेता अनिल कपूर यांनीही ‘चला आठवूया भारताचा सुवर्णमय इतिहास. या देशाचा एक भाग असल्याचा मला गर्व आहे’, असे ट्विट केले आहे. कबीर बेदी, ऋषी कपूर, विवेक ऑबेरॉय, हुमा कुरेशी यांनीही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वाचा: बिग बी अमिताभसुद्धा ‘सैराट’ झाले जी…

पाहा: VIDEO: सैन्यदलातील जवानांसह शाहरुखने साजरा केला प्रजासत्ताक दिन

आज भारताचा ६८ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. याच दिवशी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून भारत नावारुपाला आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारतीय राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आणली गेली. तेव्हापासून भारतात लोकशाहीचे नवे पर्व सुरू झाले म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून ओळखला जातो.