लग्न म्हणजे स्वर्गात बांधलेल्या गाठी, जन्मोजन्मांतरीची नाती, सात जन्माचे सोबती हे सर्व ऐकायला सुंदर वाटतं असलं तरी आता काळानुरुप नात्यांच्या व्याख्या बदलत चालल्या आहेत. लग्न न करताच प्रेम असेल तर लिव्ह इनमध्ये एकमेकांसोबत राहणं, लग्न झालं असलं तरी प्रेम कमी झालं म्हणून सामंजस्याने विभक्त होणं, लग्नाचा सोबती असला तरी परस्पर समंतीने विवाहबाह्य संबध ठेवणं या अलिकडेच्या वेब शो आणि सिनेमांमध्ये दिसणाऱ्या गोष्टी अगदीच काल्पनिक नाहीत. समाजात असलेल्या स्थितीचंच ते प्रतिबिंब आहे.

एकीकडे भारतीय विवाह संस्था ही व्याख्या बदलतेय की काय असं वाटतं असतानाच नात्यांच्या या गर्दीत अशी अनेक जोडपी आहेत जी अनेक छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद शोधत आपलं नातं खुलवतं आहेत. आयुष्यात आलेल्या प्रत्येक सुख दु:खाच्या, अटीतटीच्या काळात या संकटांचा बरोबरीने सामना करत लग्न हे नातं जिवंत ठेवत आहेत. यापैकीच एक म्हणते साकेत आणि जुई. एमएक्स प्रेअरवर नुकताच ‘आणि काय हवं?’ या वेब सीरिजचा तीसऱा सिझन रिलीज झालाय. या वेब सीरिजमध्ये खऱ्या आयुष्यातील मराठमोळं क्यूट कपल उमेश कामत आणि प्रिया बापट मुख्य भूमिका साकारत आहेत. या आधीच्या दोन्ही सिझनमध्ये त्यांची जूई आणि साकेत ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. वरुण नार्वेकर लिखीत आणि दिग्दर्शित ‘आणि काय हवं?’ या वेब सीरिजमधील जुई आणि साकेत आपणच आहोत का असा भास अनेकांना या वेब सीरिजचे दोन्ही सिझन पाहताना नक्कीच झाला असले.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

या वेब सीरिजच्या पहिल्या सिझनमध्ये जुई आणि साकेतच्या लग्नानंतर नुकत्याच सुरु झालेल्या संसाराची सुरुवात पाहायला मिळाली. प्रत्येक नविन गोष्टीत गोडवा असतो. तसाच त्यांच्या नात्यातला गोडवा या सिझनमध्ये पाहायला मिळाला. तर दुसऱ्या सिझनमध्ये जुई आणि साकेतच्या लग्नाला ३ वर्ष पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आलंय. जुई आणि साकेतच्या आंबट-गोड नात्याचा मुरांबा या सिझनमध्ये देखील प्रेक्षकांना चांगलाच पसंत पडला. प्रोफेशनल लाइफ, लग्न, घरं आणि संसार हे सांभाळणं केवळ एका महिलेची जबाबदारी नाही तर पती पत्नीने एकत्रितपणे चालायची ही सुंदर वाट आहे. हा अलिकडच्या अनेक तरुण जोडप्यांचा दृष्टीकोन या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळाला.

दोनही सिझनला मिळालेल्या यशानंतर अखेर ‘आणि काय हवं?’ चा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनमध्ये आता जुई आणि साकेतच्या लग्नाला ५ वर्ष पूर्ण झाली आहेत. खरं तर लग्नाला किती वर्ष झाली हे महत्वाचं नसून तुम्ही मनाने किती तरुण आहात, तुमची मनं किती जोडली गेली आहेत हेच साकेत आणि जुईच्या नात्याकडे पाहून लक्षात येतं. तिसऱ्या सिझनमध्ये देशात करोना माहामारीनंतरचा लॉकडाउनचा काळ पाहायला मिळतो. मात्र यावेळी जुई आणि साकेतचं नातं अधिक दृढ आणि घट्ट झाल्याचं पाहायला मिळतंय.

रोजच्या धकाधकीच्या जिवनात पती पत्नीने आपलं नात अधिक फुलवण्यासाठी काय करायला हंव याची पुसटशी कल्पना हा वेब शो पाहताना येते. एकमेकांमध्ये संवाद सुरु ठेवणं, आपल्या आवडी निवडी जपत एकमेकांच्या आवडी निवडीच्या गोष्टींमध्ये सहभागी होतं ते आनंदाचे क्षण जगणं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधून ते क्षण एकत्रीत जगणं या गोष्टींची जाणीव जुई आणि साकेतच्या नात्याकडे बघून होते. आणि याच गोष्टी कदाचित सुखी वैवाहिक जीवनासाठी महत्वाच्या असल्याचं लक्षात येतं.

हल्लीचे करिअर ओरिएंटेड कपल्स घरीसुद्धा ऑफिस घेऊन येतात. दिवसभर ऑफिसमध्ये केलेली कामे, तिथले ताणतणाव, चिडचिड, बॉस, सहकाऱ्यांसोबतचे संवाद अशा अनेक गोष्टी ऑफिस सुटल्यावर घरी सुद्धा येतात. अनेकदा घरी आल्यावरही आपल्या पार्टनरसोबत त्याच्याच चर्चा रंगतात. नवरा बायकोच्या हेल्दी रिलेशनशीपसाठी हे कधी नुकसान करणारेही ठरू शकते. याच गोष्टी कधी कधी भांडणासाठी कारणीभूत ठरतात. अशा वेळी या चर्चा टाळून एकमेकांना वेळ देत आपण आपले नाते अधिकच दृढ करू शकतो, हे एमएक्स एक्सक्लुझिव्ह आणि मिर्ची ओरिजनल्स क्रिएशन निर्मित, वरूण नार्वेकर दिग्दर्शित ‘आणि काय हवं’च्या तिसऱ्या सिझन मध्ये पाहायला मिळतं.

‘आणि काय हवं’ च्या तिसऱ्या सिझनची देखील हिच खरी मजा आहे. शोमधील अनेक घटनांशी आपण जोडले जातो. अर्थात लेखक आणि दिग्दर्शक वरुण नार्वेकरच्या लेखनाला याचं श्रेय जातं. यात लेखनाच्या जादूसोबतच प्रिया आणि उमेशने त्यांच्या भूमिकांमध्ये जीव ओतला असून जूई आणि साकेत जीवंत केले आहेत. तिसऱ्या सिझनच्या संपूर्ण सहा भागांमध्ये प्रिया आणि उमेशने जूई आणि साकेतच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण जिवंत केले आहेत.

जूई-साकेतच्या नात्यातल्या गमती जमती पाहत असताना शेवट मात्र काहिसा अपूर्ण वाटतो. लेखक आणि दिग्दर्शकाने शेवट आणखी काही तरी सरप्राइजने किंवा सुंदर करायला हवा होता. काही तरी राहून गेलं अशी भावना प्रेक्षकांच्या मनात येऊ शकते. असं असंलं तरी विकेण्डला बिंज वॉचसाठी ‘आणि काय हवं?’ या उत्तम पर्याय असून यामुळे मुळे तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य फुलेल.

लोकसत्ता ऑनलाइनकडून साडे तिन स्टार्स