scorecardresearch

रिया चक्रवर्ती अलिबागच्या व्हिलामध्ये एन्जॉय करतेय सुट्ट्या, एका रात्रीचे भाडे माहितीये का?

नुकतंच तिने याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सातत्याने चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे रिया चक्रवर्ती. रिया ही नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसंबंधित ड्रग्ज प्रकरणी अडकल्यानंतर रियाला अटक झाली होती. सध्या रिया ही अलिबागमध्ये सुट्टया एन्जॉय करताना दिसत आहे. नुकतंच तिने याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुकतंच रियाने इनस्टाग्रामवर अलिबागमधील सुट्ट्यांचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने तिच्या हॉलिडे होमची झलक दाखवली आहे. त्यासोबतच ती तिच्या सुट्ट्या छान एन्जॉय करत असल्याचेही दिसत आहे.

रियाने शेअर केलेल्या या व्हिडीओ ती अलिबागमधील एका व्हिलामध्ये असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती अलिबागमधील स्विमिंग पूलजवळच्या पायऱ्यांवर चालताना दिसत आहे. त्यानंतर तिने तिच्या खोलीची झलकही दाखवली आहे. ही खोली सर्व सुविधांनी सुसज्ज असल्याचे दिसत आहे.

अलिबागमध्ये रिया चक्रवर्ती ज्या व्हिलामध्ये सुट्टी घालवत आहे. त्या व्हिलामध्ये सहा बेडरूम आहेत. त्यासोबत लॉन आहे. विशेष म्हणजे या व्हिलाला एक स्विमिंग पूलही पाहायला मिळत आहे. दरम्यान रिया चक्रवर्ती राहत असलेल्या तो व्हिला प्रशस्त आहे. यातील प्रत्येक खोलीचे एका रात्रीचे भाडे ३२ हजार ५०० रुपये आहे.

दरम्यान बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचे निधन होऊन एक वर्ष उलटलं आहे. त्याच्या निधनानंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण चर्चेत आलं होतं. यानंतर अनेक मोठमोठ्या कलाकारांची चौकशी करण्यात आली. सुशांत सिंह राजपूतसंबंधित ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीचे नावही समोर आले होते. याप्रकरणी १ महिन्यासाठी तिला तुरुंगवासाची शिक्षाही भोगावी लागली होती. रिया गेल्यावर्षी ‘चेहरे’ चित्रपटात दिसली होती. यात अमिताभ बच्चन, क्रिस्टल डिसूझा आणि इमरान हाश्मी यांनी भूमिका केल्या होत्या.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rhea chakraborty shares glimpse of her lavish holiday in alibaug paying this much rent for a villa nrp